TRENDING:

हार्दिक मैदानात, ती गॅलरीत, दोघांच्या खाणाखुणा, नजरेतून एकमेकांना उत्तरं, Video Viral

Last Updated:

हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हायरल व्हिडिओमध्ये तो गॅलरीत बसलेल्या तिला खाणाखुणा करताना दिसला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Hardik Pandya Viral Video : टीम इंडियाच्या सूपर 8 सामन्याला उद्यापासून सूरुवात होत आहे.भारताचा पहिला सामना हा साऊथ आफ्रिकेविरूद्ध अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याला रविवारी संध्याकाळच्या सुमारास सूरूवात होणार आहे. या सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हायरल व्हिडिओमध्ये तो गॅलरीत बसलेल्या तिला खाणाखुणा करताना दिसला होता. त्यामुळे या व्हिडिओची चर्चा रंगली आहे.
hardik pandya mahika sharma
hardik pandya mahika sharma
advertisement

खरं तर हा व्हिडिओ नेदरलँड विरूद्धच्या सामन्या दरम्यानचा आहे. या सामन्यात भारताने नेदरलँडचा 17 धावांनी पराभव केला होता.या पराभवानंतर टीम इंडिया मैदानात प्रेझेटेशनसाठी होती. याच दरम्यान हार्दिक पांड्या ब्राऊंड्री लाईनवर जातो आणि खाणाखुणा करायला सूरूवात करतो.

advertisement

हार्दिक पांड्या जिला खाणाखुणा करतो ती दुसरी तिसरी कुणी नसून त्याची 25 वर्षीय गर्लफ्रेड माहिका शर्मा आहे. खरं तर सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारी 2026 ला माहिका शर्माचा वाढदिवस होता. त्यामुळे हार्दिक पांड्या या वाढदिवसानिमित्त प्रचंड उत्साहित होता. म्हणून तो मैदानात पहिल्यांदा तिच्याकडे पाहून तिला किस करतो. आणि नंतर तुला केक कापायचा आहे आणि मला खायचा आहे हे हातवारे करून सांगतो. या दरम्यान मैदान गाण देखील वाजते आहे. शेवटी हार्दिक पांड्या तिला सांगतो जा तिकडे आणि मी येतो, असे व्हिडिओत दिसत आहे.

advertisement

हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून माहिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.या दरम्यान त्याने फोटोच्या कॅप्शनला हॅप्पी बर्थडे माय प्रिन्सेस, तु खुप चांगली व्यक्ती आहे,आय लव्ह यू असे लिहले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

हार्दिक आणि माहिकाच्या नात्याबद्दलच्या अफवा बऱ्याच काळापासून पसरत आहेत, परंतु हार्दिकने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अधिकृतपणे याची पुष्टी केली. तेव्हापासून, दोघेही अनेक वेळा एकत्र दिसले आहेत. अलिकडेच, मुंबईत झालेल्या "युनायटेड इन ट्रायम्फ" कार्यक्रमात ते काळ्या पोशाखात हात धरून जुळ्या जोडप्यांमध्ये दिसले होते. ते अनेकदा एकत्र सुट्टीवर जातात आणि चाहत्यांसह फोटो शेअर करतात.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
हार्दिक मैदानात, ती गॅलरीत, दोघांच्या खाणाखुणा, नजरेतून एकमेकांना उत्तरं, Video Viral
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल