खरं तर वानखेडेच्या मैदानावरील विजयानंतर मुंबईने तुफान जल्लोष केला.वानखेडेच्या मैदानावर हा शेवटचा सामना असल्या कारणाने मुंबईच्या संघाने मैदानावर एक फेरी मारुन मुंबईच्या चाहत्यांचे आभार मानले होते. यावेळी हार्दिक पंड्याचं लक्ष्य स्टेडिअममध्ये बसलेल्या आपल्या मुलाकडे गेले. त्याने यावेळी आपल्या मुलाकडे पाहून जल्लोष देखील केला. तसेच मुलाला फ्लँकीस देखील दिली.
त्यानंतर हार्दिक पंड्याने हातवारे करत तू घरी जा असे आपल्या लेकाला देखील सांगितले.तसेच तू त्यांच्यासोबत घरी जा आणि झोपी जा,असे देखील तो सांगताना दिसला.त्यामुळे मैदानात हार्दिक पंड्यामध्ये बापमाणूस दिसला. एकीकडे मुंबई संघासाठी आपले नेतृत्व बजावत असताना दुसरीकडे हार्दिकने आपल्या वडीलाच कर्तव्य देखील बजावलं.
टॉप 2 ची शर्यत अवघड
दरम्यान आता मुंबई इंडियन्स पॉईट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. मुंबईला जर आता फायनल गाठायची असेल तर त्यांना काही करून टॉप 2 मध्ये येणे आवश्यक आहे.मुंबईचे सध्या 16 गुण आहेत. मुंबई जर त्यांचा पुढचा सामना दिल्लीविरूद्ध जिंकली तर त्यांचे गुण 18 होणार आहे. पण या गुणांच्या बळावर त्यांना टॉप 2 मध्ये पोहोचता येणार नाही आहे.
कारण बंगळुरू आणि पंजाबचे दोन सामने उरले आहेत आणि दोघांचे गुण 17 आहेत. दोघांनी एक जरी सामना जिंकला तरी त्यांचे गुण 19 होणार आहे.गुजरातचा एक सामना बाकी आहे. त्यामुळे गुजरात हा सामना जिंकून 20 धावांपर्यंत पोहोचू शकतो.त्यामुळे मुंबई टॉप 2 मध्ये पोहोचणे अवघड आहे.