समालोचक हर्षा भोगले यांनी या मुद्यावर आता भाष्य केले आहे. ते त्याच्या एक्सवर लिहतात की, खरंच?? बुमराहला ट्रोल करत आहात? आशा आहे की तुम्ही त्यापैकी नसाल पण जर असाल तर तुम्हाला बुमराह बनण्यासाठी काय सहन करावे लागते याची कल्पना नाही? हे खरे आहे. आणि तुम्हाला भारताच्या महान मॅचविनरपैकी एकाबद्दल काहीच कौतुक नाही, जो जवळजवळ इतर कोणत्याही गोलंदाजांपेक्षा जास्त षटके टाकतो,याची आठवण भोगले यांनी फॅन्सना करून दिली.
advertisement
सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया काय?
सचिन तेंडुलकरने रेडिटवर भारत-इंग्लंड सीरिजच्या विश्लेषणाचा व्हिडिओ केला आहे. 'बुमराहने खरोखर चांगली सुरूवात केली. पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 5 विकेट घेतल्या, यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये तो खेळला नाही. यानंतर तिसऱ्या-चौथ्या टेस्टमध्ये तो खेळला. लॉर्ड्स टेस्टच्या इनिंगमध्येही त्याने 5 विकेट घेतल्या. बुमराहची बॉलिंग असाधारण आहे, त्याने आजपर्यंत जे केलं आहे ते अविश्वसनीय आहे. बुमराह सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, यात शंका नाही. मी त्याला इतर कोणत्याही बॉलरपेक्षा चांगलं मानतो', अशी प्रतिक्रिया सचिनने दिली आहे.
जसप्रीत बुमराहने 48 टेस्टमध्ये 219 विकेट घेतल्या आहेत, तर मोहम्मद सिराजला 41 टेस्टमध्ये 123 विकेट मिळाल्या आहेत. मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्टमध्ये 23 विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज या सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला.