TRENDING:

SRH vs KKR : क्लासेन क्लास खेळला! पण वेगवान शतकात Vaibhav Suryavashiचा रेकॉर्ड मोडू शकला नाही, किती बॉलमध्ये सेंच्यूरी मारली?

Last Updated:

हैदराबादकडून हैन्री क्लासेनने 105 धावांची नाबाद खेळी केलाी. या खेळीत त्याने 37 बॉलमध्ये आपलं शतक ठोकलं आहे. हे आयपीएलमधलं चौथं सर्वांत वेगवान शतक आहे. मात्र इतकं करून देखील क्लासेन 14 वर्षीय वैभव सुर्यवंशीचा रेकॉर्ड मोडू शकला नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Heinrich Klaasen Fastest Century : आयपीएलच्या आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 279 धावांचा डोंगर उभारला आहे.त्यामुळे कोलकत्तासमोर 280 धावांचे आव्हान आहे. हैदराबादकडून हैन्री क्लासेनने 105 धावांची नाबाद खेळी केलाी. या खेळीत त्याने 37 बॉलमध्ये आपलं शतक ठोकलं आहे. हे आयपीएलमधलं चौथं सर्वांत वेगवान शतक आहे. मात्र इतकं करून देखील क्लासेन 14 वर्षीय वैभव सुर्यवंशीचा रेकॉर्ड मोडू शकला नाही.
Heinrich Klaasen Fastest Century
Heinrich Klaasen Fastest Century
advertisement

सनरायझर्स हैदराबादकूडन खेळताना हेन्री क्लासेनने वादळी शतक ठोकलं आहे. हेन्री क्लासेनने अवघ्या 37 बॉलमध्ये हे शतक ठोकलं आहे. या खेळीत त्याने 9 षटकार आणि 7 चौकार मारले आहेत. या खेळीने त्याने आयपीएल मधलं वेगवान शतक ठोकल आहे. तसेच वेगवान शतकात त्याने युसूफ पठाणच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. युसुफ पठाणने 2010 च्या आयपीएल हंगामात शतक ठोकलं होतं.आज याच शतकाच्या बरोबरी क्लासेनने केली आहे.

advertisement

आयपीएलमधील सर्वात जलद शतक (चेंडूंच्या आधारे)

30 - ख्रिस गेल (आरसीबी) विरुद्ध पीडब्ल्यूआय, बेंगळुरू, 2013

35 - वैभव सूर्यवंशी (आरआर) विरुद्ध जीटी, जयपूर, 2025

37 - युसूफ पठाण (आरआर) विरुद्ध एमआय, मुंबई बीएस, 2010

37 - हेनरिक क्लासेन (एसआरएच) विरुद्ध केकेआर, दिल्ली, 2025*

38 - डेव्हिड मिलर (केएक्सआयपी) विरुद्ध आरसीबी, मोहाली, 2013

advertisement

दरम्यान क्लासेन इतकं करून देखील 14 वर्षाच्या वैभव सुर्यवंशीचा रेकॉर्ड मोडू शकला नाही. वैभव सुर्यवंशीने याच हंगामात गुजरात विरूद्ध 35 बॉलमध्ये वेगवान शकत ठोकलं होतं. या शतकासह त्याने युसुफ पठाण आणि डेविड मिलरचा रेकॉर्ड मोडला होता. आजच्या सामन्यात क्लासेनला वैभव सुर्यवंशीचा रेकॉर्ड मोडण्याची संधी होती. मात्र फक्त 2 बॉलमुळे क्लासेन त्याचा रेकॉर्ड मोडू शकला नाही आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SRH vs KKR : क्लासेन क्लास खेळला! पण वेगवान शतकात Vaibhav Suryavashiचा रेकॉर्ड मोडू शकला नाही, किती बॉलमध्ये सेंच्यूरी मारली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल