आयपीएल प्लेऑफचं स्वप्न संपुष्टात?
जर दिल्ली हा सामना हरली तर त्यांचे प्लेऑफचं स्वप्न जवळपास संपुष्टात येईल, कारण मुंबई इंडियन्स 16 गुणांवर पोहोचून त्यांना मागे टाकतील. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यानंतर, दिल्लीला पंजाब किंग्जशी सामना करायचा आहे. जर दिल्लीने दोन्ही सामने (मुंबई आणि पंजाब विरुद्ध) जिंकले तर त्यांचे 17 गुण होतील आणि त्यांना नेट रन रेटची चिंता न करता प्लेऑफमध्ये स्थान मिळेल.
advertisement
मुंबईत पाऊस झाला तर...
जर दिल्ली मुंबई विरुद्ध जिंकली आणि पंजाब विरुद्ध हरली तर त्यांचे 15 गुण होतील. अशा परिस्थितीत त्यांचे भवितव्य 26 मे रोजी होणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यावर अवलंबून असेल. जर मुंबईने तो सामना गमावला, तरच दिल्ली प्लेऑफमध्ये जाऊ शकते. या सामन्यात मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांना एक एक गुण
जर मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला, तर दिल्लीचे 14 गुण होतील आणि मुंबईचे 15 गुण होतील. त्यामुळे आता वानखेडेवरचा सामना प्लेऑफची समीकरणं बदलू शकतो.
दिल्लीसाठी करो या मरो
थोडक्यात सांगायचं झालं तर, दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना त्यांच्यासाठी 'करो या मरो' असाच आहे.'
पार्थ जिंदाल यांचं बीसीसीआयला पत्र
मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि सामना वाया जाण्याची दाट शक्यता आहे. ज्याप्रमाणे आरसीबी विरुद्ध एसआरएच यांच्यातील सामना सातत्यपूर्ण राहावे आणि लीगच्या हितासाठी बेंगळुरूहून हलवण्यात आला आहे, त्याचप्रमाणे उद्याचा सामनाही वेगळ्या ठिकाणी हलवावा अशी माझी विनंती आहे कारण आम्हाला गेल्या 6 दिवसांपासून माहित आहे की 21 तारखेला मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज आहे, असं पार्थ जिंदाल यांनी बीसीसीआयला पत्र लिहित म्हटलं आहे.