रेफरीवरून वाद
पाकिस्तान संघाने रेफरी पीयूष पांडे यांच्यावर आक्षेप होता. त्यांनी सामना सुरू होण्याआधीच रेफरी बदलण्याचा आग्रह धरला. मात्र ICC ने अधिकृत नियुक्ती झाल्यानंतर रेफरी बदलणे नियमांच्या विरुद्ध आहे असं पाकिस्तानच्या टीमला स्पष्ट सांगिते आणि रेफरी बदलला जाणार नाही हे देखील सांगितले. या कारणामुळे सामन्याचा टॉस ठरलेल्या वेळेपेक्षा एक तास उशिरा झाला.
advertisement
जर पाकिस्तानने सामना बायकॉट केला असता तर त्यांना तब्बल 140 कोटी रुपयांचा दंड भरावा लागला असता. आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला इतका मोठा दंड भरणं परवडणारं नव्हतं. त्यामुळे हा दंड टाळण्यासाठी पाकिस्तानने अखेर इच्छा नसतानाही सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले. पाकिस्तान आणि युएई यांच्यातल्या सामन्याआधी मोठा ड्रामा पाहायला मिळाला.
दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नक्वी हे पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीज राजा आणि नजीम सेठी यांच्यासोबत लाहोरच्या गडाफी स्टेडियममध्ये या मुद्द्यावर बैठक घेतली. आयोजकांकडे तक्रार करावी असं म्हणत आयसीसीने पुन्हा बॉल पाकिस्तानच्या कोर्टात टाकला. नक्वी यांनी दोन माजी अध्यक्षांचा सल्ला घेतला आणि अखेर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवार भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान टीमसोबत हात न मिळवल्याने त्याची चर्चा बरीच झाली होती. रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेटने विजय झाला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही. आता पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार असून या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.