India U19 vs South Africa U19 1st Youth odi : टीम इंडियाची सिनिअर टीमचा सामना 11 जानेवारी 2026 पासून न्यूझीलंड विरूद्ध होणार आहे. या सामन्याआधी भारताची अंडर 19 टीम साऊथ आफ्रिकेविरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतून आयुष म्हात्रे बाहेर आहे, तर वैभव सूर्यवंशीवर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.त्यामुळे पहिल्यांदाच वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. त्यामुळे वैभवच्या नेतृत्वात टीम इंडिया कशी कामगिरी करते ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
टीम इंडियाचा अंडर 19 संघ नवीन वर्षात साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताना तीन वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेला उद्या 3 जानेवारी 2026 पासून सूरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा नियमित कर्णधार आयुष म्हात्रे फिट नाही, ज्यामुळे वैभवला या दौऱ्यासाठी अंडर 19 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.तर आरोन जॉर्जला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. या सामन्याचा टॉस दुपारी 1 वाजता पार पडणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आरोन जॉर्ज कर्णधार वैभव सूर्यवंशीसोबत भारताकडून डावाची सुरुवात करण्याची अपेक्षा आहे. जरी आरोनने सामान्यतः भारतीय 19 वर्षांखालील संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली असली तरी, तो आयुषच्या अनुपस्थितीत डावाची सुरुवात करू शकतो.
वैभव आणि आरोननंतर, भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमात राहुल, अभिज्ञान आणि हरवंश सिंग यांचा समावेश असू शकतो. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आरएस अम्ब्रिस, मोहम्मद अनन आणि दीपेश देवेंद्रन हे अष्टपैलू खेळाडू असू शकतात. अनन हा स्पिन अष्टपैलू खेळाडू आहे, तर दीपेश हा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे. संघातील इतर गोलंदाजांमध्ये कनिष्क चौहान, हेनिल पटेल आणि उद्धव मोहन यांचा समावेश असू शकतो.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
वैभव सूर्यवंशी (कर्णधार), आरोन जॉर्ज (उपकर्णधार), राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंग, आरएस अम्ब्रिस, मोहम्मद अनन, दीपेश देवेंद्रन, कनिष्क चौहान, हेनिल पटेल आणि उद्धव मोहन.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ :
वैभव सूर्यवंशी (कर्णधार), आरोन जॉर्ज (उपकर्णधार), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंग (विकेटकीपर), आर.एस. अम्ब्रिस, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, मोहम्मद अनन, हेनिल पटेल, डी. दिपेश, किशन कुमार सिंग, उद्धव मोहन, युवराज गोहिल, राहुल कुमार.
