सूर्याकडून संजू अन् बुमराहचं कौतुक
आजची मॅच जिंकणं म्हणजे अविश्वनीय गोष्ट होती. भारतीय खेळाडूंनी चांगला गेम खेळला. खासकरून संजू सॅमसन, ज्याने विकेट गेल्यानंतर देखील त्याचा अटॅकिंग गेम सोडला नाही. त्याच्या आक्रमक गेममुळे इंग्लंडवर प्रेशर टाकता आलं, असं सूर्या म्हणाला. तसेच त्याने बुमराहचं देखील कौतूक केलं. जेव्हा टीमला बुमराहची गरज असते, तेव्हा तो आपले हात वर करतो आणि टीमच्या विजयाची वाट मोकळी करून देतो. तो आमच्यासाठी खास प्लेयर आहे, असंही सूर्या म्हणाला. त्यावेळी त्याने एक चकित करणारं वक्तव्य केलं.
advertisement
टी दिलीप यांना दिलं विजयाचं क्रेडिट
सूर्यकुमारने बोलताना टीम इंडियाची फिल्डिंग कोच टी दिलीप यांना विजयाचं क्रेडिट दिलं. अक्षर पटेलच्या फिल्डिंगवर बोलताना सूर्याने टी दिलीप यांच्या ट्रेनिंगचं कौतुक केलं. टी दिलीप यांनी प्रॅक्टिस सेशनमध्ये जी काही मेहनत घेतली. याचं हे फळ आहे, असंही सूर्यकुमार यादव म्हणाला. त्यावेळी तो शिवम दुबेचं देखील नाव घेणं विसरला नाही. शिवम दुबे याने स्ट्राईक रेट कमी होऊ दिला नाही. त्यामुळे गेमला बुस्ट मिळाला. आम्हाला तिथं स्ट्राईक रेट वाढवायचा होता, आमच्यासाठी दुबेने ते काम केलं, असंही सूर्यकुमार यादव म्हणाला.
अभिषेक शर्माला ड्रॉप करणार?
दरम्यान, सूर्यकुमारने पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये बोलताना मोठं वक्तव्य केलं. अभिषेक शर्माच्या कामगिरीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी देखील सूर्यकुमार यादव याने अभिषेकला बॅक केलं. आमचे टॉप 3 खेळाडू बदलणार नाहीत. शिवम दुबेला आम्ही घेयर चेंजसाठी पाठवलं होतं. आम्ही जशी गरज पडेल तसा गेम चेंज करू, असंही सूर्या यावेळी म्हणाला. त्यावेळी त्याने वानखे़डेच्या प्रेक्षकांचं कौतुक करण्यास विसरला नाही. वानखेडेच्या प्रेक्षकांनी जोश निर्माण करून दिला. असं क्राऊड मी कुठंच पाहिलं नाही. आम्ही प्रॅक्टिस करताना 80 टक्के ग्राऊंड भरलं होतं. त्यामुळे हा अविश्वसनीय गेम आहे, असंही सूर्या यावेळी म्हणाला.
