काय म्हणाले रवी शास्त्री?
मला वाटतं की, अभिषेक शर्मा चांगली कामगिरी करू शकतो. त्यामुळे त्याला ड्रॉप करून चालणार नाही. त्याला खेळवावं लागेल. तुम्हाला माहिती असेल तर अभिषेकने इंग्लंडविरुद्धच्या टी-ट्वेंटी सिरीजमध्ये अफलातून कामगिरी केली होती. त्यामुळे तो वानखेडेवर मोठी इनिंग खेळी शकतो. त्याच्यात ती क्षमता आहे, असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.
advertisement
काय म्हणाला रिकी पॉन्टिंग?
कधीकधी, जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या मंदीतून जात असता, तेव्हा दररोज नेटमध्ये जाऊन दीड तास बॅटिंग करणं नेहमीच चांगलं नसतं. कधीकधी या खेळाडूंना फक्त काही दिवस विश्रांती देणं चांगलं असतं, असंही रिकी पॉन्टिंग म्हणालाय. जसं की मॅचआधी तुम्ही मानसिकदृष्ट्या ताजेतवानं व्हा. कौशल्ये कुठंही जात नाहीत, तुम्ही तुमचे कौशल्य गमावत नाही, असंही रिकी पॉन्टिंग म्हणालाय.
अभिषेक शर्माची टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील कामगिरी
दरम्यान, अभिषेक शर्मा साखळी फेरीत अमेरिका, पाकिस्तान आणि नेदरलँड्स विरुद्ध खेळताना सलग 3 वेळा 'डक' म्हणजेच शून्य रन्सवर बाद होण्याचा नकोसा विक्रम आपल्या नावावर केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने 12 बॉलमध्ये 15 रन्स केले, ज्यामुळे तो थोड्या फॉर्ममध्ये परतत असल्याचे संकेत मिळाले. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध 30 बॉलमध्ये 4 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 55 रन्सची वेगवान इनिंग खेळली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या 'करो या मरो'च्या महत्त्वाच्या मॅचमध्ये अभिषेककडून मोठ्या इनिंगची अपेक्षा होती, पण त्याने 11 बॉलमध्ये केवळ 10 रन्स करून चाहत्यांची निराशा केली.
