भारताने दिलेल्या 238 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सूरुवात खराब झाली होती. कारण भारताच्या पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर अर्शदिप सिहने डेवॉन कॉन्वेची विकेट घेतली होती. त्याचं झालं असं की अर्शदिपने टाकलेला बॉल डेवॉन कॉन्वेच्या बॅटीला कड लागून विकेटमागे गेला.यावेळी विकेटकिपर संजू सॅमसनने डाव्या दिशेने उडी मारून कॅच घेतली आहे.विशेष म्हणजे त्याने ही कॅच अवघ्या 0.68 सेंकदात घेतली आहे. या अर्थ त्याने ही कॅच घ्यायला 1 सेकंद देखील लावला नाही.म्हणजेच एक वेळच्या डोळेझाक करणाऱ्या जितका वेळ लागतो तितक्या सेकंदात त्याने ही कॅच घेतली आहे.त्यामुळे या कॅचचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
advertisement
पहिल्या ओव्हरमध्ये विकेट पडल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने रचिन रविंद्रला कॅच आऊट केले होते होते.त्यामुळे अवघ्या 1 धावांवर न्यूझीलंडचे 2 विकेट पडले होते.,त्यानंतर ग्लेन फिलिप्सने न्यूझीलंडचा डाव सावरला आहे.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सूरूवात धडाकेबाज झाली होती. भारताकडून अभिषेक शर्माने 35 बॉलमध्ये 84 धावांची खेळी केली होती. तर रिंकु सिंहने 20 बॉल 44 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर भारताने 238 धावा केल्या होत्या.
