TRENDING:

IND vs NZ : भारताचे खेळाडू साखरझोपेत असताना न्यूझीलंडचा नवा डाव, कॅप्टन सँटनरची एका गोष्टीमुळे झोप उडाली! म्हणाला 'सॉरी...'

Last Updated:

Mitchell Santner beautiful message New Zealand fans : मॅचच्या आदल्या रात्री न्यूझीलंडच्या कॅप्टनने एक मोठा निर्णय घेतला अन् एक पत्रच लिहिलं. मिचेल सँटनरने न्यूझीलंडच्या फॅन्सला उद्देशून एक भावनिक पत्र लिहिलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India vs New Zealand Final : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये खेळवली जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय टाईमनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरूवात होईल. दोन्ही टीम तगड्या असल्याने आता मॅचमध्ये काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच मॅचच्या आदल्या रात्री न्यूझीलंडच्या कॅप्टनने एक मोठा निर्णय घेतला अन् एक पत्रच लिहिलं. मिचेल सँटनरने न्यूझीलंडच्या फॅन्सला उद्देशून एक भावनिक पत्र लिहिलं आहे.
 Mitchell Santner beautiful message to the fans
Mitchell Santner beautiful message to the fans
advertisement

1.4 बिलियन चाहत्यांची फौज

सँटनरने आपल्या मेसेजमध्ये मान्य केलं की, भारतीय भूमीवर खेळताना त्यांना प्रचंड दबावाचा सामना करावा लागणार आहे. त्याने नमूद केलं की, समोर 1.4 बिलियन भारतीय चाहत्यांची फौज उभी आहे. सुमारे 130000 प्रेक्षक क्षमता असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये बहुतांश फॅन्स हे टीम इंडियालाच सपोर्ट करतील, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, असंही सँटनरने आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे.

advertisement

पहाटे 2.30 वाजता...

न्यूझीलंडमध्ये ही मॅच सोमवारी पहाटे 2.30 वाजता सुरू होणार आहे. एवढ्या सकाळी उठून मॅच पाहणं चाहत्यांसाठी कठीण असले तरी, सँटनरने त्यांना अलार्म लावून उठण्याची विनंती केली आहे. "आम्ही जरी तुमच्यापासून लांब असलो, तरी तुमचे सोशल मीडिया पोस्ट, फोटो आणि तुमची आपुलकी आम्हाला जाणवते," असं म्हणत त्याने चाहत्यांच्या पाठिंब्याचे महत्त्व अधोरेखित केलं.

advertisement

चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज

जर सोमवारी ऑफिस किंवा शाळेत जायला उशीर झाला, तर माझा हा निरोप तुमच्या बॉस किंवा शिक्षकांना दाखवा. चाहत्यांनी दिलेल्या या प्रतिसादामुळेच मैदानावर लढण्याची ताकद मिळते, असंही त्यानं आवर्जून सांगितलं. न्यूझीलंड संघ यावेळेस पूर्ण तयारीत असून भारताच्या आव्हानाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत त्यानं या पोस्टमधून दिले आहेत.

advertisement

वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन येऊ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दरात वाढ नाहीच, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, आम्ही लवकरच मायदेशी परतू आणि येताना सोबत काही 'जास्तीचे सामान' (वर्ल्ड कप ट्रॉफी) घेऊन येऊ, असं आश्वासन देखील सँटनरने या पोस्टमधून केलं आहे. सँटनरच्या या पोस्टमुळे न्यूझीलंडच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, भारतीय फॅन्सना मात्र यंदा घरच्या मैदानावर टीम इंडियाच बाजी मारणार असा ठाम विश्वास आहे. त्यामुळे आता मॅचमध्ये काय होणार? असा सवाल विचारला जातोय.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ : भारताचे खेळाडू साखरझोपेत असताना न्यूझीलंडचा नवा डाव, कॅप्टन सँटनरची एका गोष्टीमुळे झोप उडाली! म्हणाला 'सॉरी...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल