खरं तर भारत पाकिस्तान सामन्या दरम्यान पाकिस्तानचा वादग्रस्त बॉलर उस्मान तारीकची प्रचंड चर्चा रंगली आहे. हा बॉलर गोलंदाजी करताना अचानक पॉज घेऊन गोलंदाजी करतो, त्यामुळे फलंदाजांना थोडे बाचकतात आणि त्याचं खेळण्यावरच संतुलन बिघडत आणि ते आऊट होऊन बसतात. आता हाच गोलंदाज भारताला अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने त्याला आपला ट्रम्पकार्ड म्हटलं आहे.
advertisement
पण या सामन्याआधी सूर्याने मोठा डाव टाकून पाकिस्तानचा प्लेअर फोडला.त्याचं झालं असं की आजच्या प्रॅक्टीस सेशनमध्ये सूर्यकुमार यादव हा अभिषेक शर्माला गोलंदाजी करत होता. या दरम्यान तो उस्मान तारीकसारखाच गोलंदाजी करताना पॉज घेऊन गोलंदाजी करत होता.त्यामुळे सूर्याने एकप्रकारे उस्मान तारीख सारखी गोलंदाजी करून खेळाडूंना त्यांच्या विरूद्ध कसं खेळायचं याची संपूर्ण ट्रेनिंग दिली आहे.
त्यामुळे सूर्याचीहीच गोलंदाजी पाहून त्याने पाकिस्तानचा प्लेअर फोडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता सूर्याने दिलेली ही प्रॅक्टीस आता खेळाडूंना किती कामी येते? हे आता सामन्या दरम्यानच कळणार आहे. विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवचा या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ पाहून पाकिस्तानची झोप उडाली आहे.
अभिषेकने अर्धातास घाम गाळला
डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मा सुमारे 30 मिनिटे कोणत्याही अडचणीशिवाय फलंदाजी करत होता आणि पूर्णपणे तंदुरुस्त दिसत होता.सुरुवातीला अभिषेकने कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्या फिरकी गोलंदाजीचा सामना केला आणि आक्रमक फटके खेळले, जे पाकिस्तानच्या फिरकी हल्ल्यासाठी एक संकेत मानले जात होते.त्यानंतर त्याने वेगवान गोलंदाजांविरुद्धही चांगले फटके खेळले.त्याच्या फूटवर्कमध्ये फारशी हालचाल नव्हती, परंतु त्याच्या जलद हातांनी आणि चेंडूची लांबी वाचण्याची क्षमता यामुळे ही भरपाई झाली.अभिषेक फिट झाल्यामुळे भारताची चिंता मिटली आहे.
