आमच्या स्पिनर्सवर पूर्ण विश्वास होता, पण...
मॅच संपल्यानंतर सलमान अली आगा म्हणाला की, "आमचा आमच्या स्पिनर्सवर पूर्ण विश्वास होता, पण आज त्यांचा दिवस नव्हता. खेळाच्या काही महत्त्वाच्या टप्प्यांवर परिणाम दाखवता आला नाही. गेल्या सहा महिन्यांत आमच्या स्पिनर्सनी खूप चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांच्याकडून आज मोठ्या अपेक्षा होत्या." खरं तर, भारतीय बॅटर्ससमोर पाकिस्तानी फिरकीपटू हतबल दिसले, ज्यामुळे भारताने 175 रन्सचा डोंगर उभा केला होता.
advertisement
भारतीय बॅटर्सला विजयाचं क्रेडिट
टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याच्या निर्णयावरही सलमानने स्पष्टीकरण दिलं की, पहिल्या डावात पीच थोडी चिकट होती आणि बॉल पकड घेत होता. मात्र, भारताने त्या परिस्थितीतही चांगली धावसंख्या उभारली, असं म्हणत सलमानने भारतीय बॅटर्सला विजयाचं क्रेडिट दिलं. तर दुसऱ्या डावात खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक चांगली झाली होती, पण पाकिस्तानी फलंदाजांनी संयम दाखवला नाही आणि मोठी पार्टनरशीप तयार करण्यात पाकिस्तानी बॅटर्स अपयशी ठरले, असंही सलमान म्हणाला.
तुम्ही कायम बॅकफूटवर असता
दरम्यान, भारत-पाक सामन्यात भावना नेहमीच तीव्र असतात, पण आम्हाला त्यातून लवकर बाहेर पडावे लागेल. आमच्याकडे पुढच्या मॅचसाठी फक्त 2 दिवसांचा वेळ आहे. आम्हाला नामिबियाविरुद्धची पुढची मॅच जिंकून सुपर 8 साठी पात्र व्हायचे आहे. बॅटिंगमध्ये आमची सुरुवात खराब झाली. टी-20 फॉरमॅटमध्ये जर तुम्ही पॉवरप्लेमध्येच 3 किंवा 4 विकेट्स गमावल्या, तर तुम्ही कायम बॅकफूटवर असता, असंही सलमान अली आगा म्हणालाय.
