बाबर आजमच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अहमदाबादला पोहोचला आहे. त्यांच्या स्वागतासाठी मुलींचा डान्सही होता. याशिवाय खेळाडूंवर पुष्पवृष्टीही केली गेली. पाकिस्तानी खेळाडूंच्या या स्वागतावर भारतीय पाठिराख्यांनी सडकून टीका केलीय. काही युजर्सनी भारतीय लष्कराचे फोटो शेअर करत जवानांचे बलिदान विसरले का असा प्रश्न विचारला आहे.
पाकिस्तानी खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यासाठी तरुणी गुजराती वेशभुषेत आल्या होत्या. ढोलवादनही केले गेले. सोशल मीडियावर या स्वागताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याआधी पाकिस्तानचा संघ भारतात येताच पाहुणचाराने भारवल्याचे व्हिडीओ समोर आले होते.
पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना नेदरलँडविरुद्ध खेळला. त्यात त्यांनी ८१ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर दुसऱा सामना हैदराबादमध्ये श्रीलंकेविरुद्ध झाला. तो सामना पाकिस्तानने ६ गडी राखून जिंकला. भारताचाही हा तिसरा सामना असणार आहे. याआधी भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला आहे.