भारत-पाकिस्तान सामन्यात तिलक वर्माने चांगली कामगिरी केली. चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या तिलक वर्माने सावध सुरूवात केली. 17 बॉलमध्ये 20 रनवर खेळत असताना तिलकने 19व्या ओव्हरमध्ये आक्रमण केलं. शाहीन आफ्रिदीला तिलक वर्माने सिक्स आणि फोर मारला. 19 बॉलमध्ये 30 रनवर नाबाद राहून तिलकने भारताला विजय मिळवून दिला.
तिलकच्या या कामगिरीनंतर गावसकरांनी त्यांच्या कॉलममध्ये त्याचं कौतुक केलं. 'शेवटी आणखी एक सुपर-प्रतिभावान बॅटर असलेल्या तिलक वर्माने पाकिस्तानचा सर्वोत्तम बॉलर शाहीन शाह आफ्रिदीला नेट बॉल स्पिनर समजून हाणलं आणि भारताला विजय मिळून दिला', असं गावसकर म्हणाले.
advertisement
सुनिल गावसकर यांनी त्यांच्या कॉलममध्ये अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या दोन्ही भारतीय ओपनरचीही तोंड भरून स्तुती केली. या दोघांनीही टीम इंडियाला 105 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. गिल आणि अभिषेकच्या जोडीने पाकिस्तानच्या विजयाच्या आशा भंग केल्या आणि टीम इंडिया सहज जिंकली, अशी प्रतिक्रिया गावसकरांनी दिली.
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये शाहिन आफ्रिदीला एकही विकेट मिळाली नाही, त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या.
टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर
पाकिस्तानविरुद्धच्या या विजयासह भारत पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारत आणि बांगलादेशचे समान पॉइंट्स असले तरी सूर्यकुमार यादवच्या टीमचा नेट रनरेट चांगला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात बुधवारी सामना होणार आहे, या सामन्यात विजय मिळाला तर भारतीय टीम फायनलमध्ये पोहोचेल. दुसरीकडे पाकिस्तानला त्यांचे उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. पाकिस्तानने एक सामना जरी गमावला तरी त्यांचं आव्हान संपुष्टात येईल.