खरं तर उद्या रविवारी क्रिकेट फॅन्ससाठी सुपरसंडे असणार आहे. कारण रविवारी अंडर 19 आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तानमध्ये हायव्होल्टेज लढत होणार आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशी खेळणार आहे. त्यामुळे या सामन्याचे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान हा सामना कधी पार पडणार आहे? हे जाणून घेऊयात.
भारत-पाकिस्तान अंडर-19 आशिया कप सामना कधी होईल?
advertisement
भारत-पाकिस्तान अंडर-19 आशिया कप एकदिवसीय सामना रविवार,14 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता भारतीय वेळेनुसार खेळला जाईल.
सामना कुठे होईल?
भारत अंडर-19 विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 आशिया कप एकदिवसीय 2025 सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर होणार आहे.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे होईल?
भारत अंडर-19 विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 आशिया कप एकदिवसीय 2025 सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल आणि सोनीलिव्हवर स्ट्रीम केला जाईल.
भारत अंडर 19 संघ: आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकिपर), कनिष्क चौहान, खिलन पटेल, दीपेश देवेंद्रन, किशन कुमार सिंग, हेनिल पटेल, हरवंश पनगालिया, नमन पुष्पक, युवराज गोविंद, गोविंद मोहन
पाकिस्तान U19 संघ: उस्मान खान, समीर मिन्हास, अली हसन बलोच, अहमद हुसैन, फरहान युसफ (कर्णधार), हमजा जहूर (विकेटकिपर), हुजैफा अहसान, निकाब शफीक, दानियाल अली खान, मोहम्मद सय्यम, अली रझा, अब्दुल सुभान, मोहम्मद हुजैफा, मोमीन कमर, मोहम्मद शायन
