हार्दिक पांड्या जरी या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तरी अक्षर पटेलनेही मोलाचं योगदान दिलं. अक्षर पटेल जेव्हा भारताकडून टी-20 सामना खेळतो तेव्हा तो कधी बॅटिंग, कधी बॉलिंग तर कधी फिल्डिंगनेही मॅच जिंकवून देतो. अनेकदा अक्षर पटेलला त्याच्या या कामगिरीचं श्रेय दिलं जात नाही.
कटकमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात अक्षर पटेलने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमला बोल्ड केलं. मार्करम आणि ट्रिस्टन स्टब्सची जोडी सेट व्हायच्या आधीच अक्षरने मार्करमला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मार्करमची विकेट जाताच दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग गडगडायला लागली. यानंतर अक्षरने एनरिक नॉर्कियाचीही विकेट घेतली. अक्षरने 2 ओव्हरमध्ये फक्त 7 रन देऊन 2 विकेट मिळवल्या. त्याआधी बॅटिंगमध्येही अक्षरने 23 रनचं महत्त्वाचं योगदान दिलं.
advertisement
एडन मार्करमची विकेट महत्त्वाची मानली जात होती कारण कटकच्या मैदानात दव पडायला सुरूवात झाली, त्यामुळे भारतीय बॉलरना बॉलिंग करण्यात अडचणी येतील, असं मानलं जात होतं. पण भारतीय बॉलरनी सुरूवातीपासूनच दक्षिण आफ्रिकेवर दबाव बनवला, त्यामुळे 8 ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने 50 रनवर 5 विकेट गमावल्या होत्या.
टीम इंडिया नंबर वन
टी-20 क्रमवारीमध्ये टीम इंडिया सध्याची वर्ल्ड चॅम्पियन आहे. तसंच आयसीसी क्रमवारीमध्येही भारतीय टी-20 टीम पहिल्या क्रमांकावर आहे. टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट नव्या उंचीवर गेली आहे, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे टीममध्ये असलेले ऑलराऊंडर. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल या ऑलराऊंडरनीच भारताला विजय मिळवून दिला.
अक्षर पटेलची कामगिरी
कटकमधल्या टी-20 सामन्याआधी अक्षर पटेलने 83 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 138 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे, तर बॉलिंगमध्ये त्याने फक्त 7.25 च्या इकोनॉमी रेटने 79 विकेटही घेतल्या आहेत. काही सामन्यांमध्ये तर अक्षर पटेलने फिल्डिंगमध्ये उत्कृष्ट कॅच पकडून मॅचही फिरवली आहे, त्यामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी अक्षर पटेल टीम इंडियाचा हुकमी एक्का असेल.
