India vs South Africa 1st T20i : कटकमधील बाराबतीच्या स्टेडिअममध्ये सुरू असलेला भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात सूरू असलेला सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने खतरनाक कमबॅक केलं आहे. हार्दिक पांड्याने 59 धावांची नाबाद खेळी केली आहे. या खेळीत त्याने 6 चौकार आणि चार षटकार लगावले आहेत. या बळावर भारताने 6 विकेट गमावून 175 धावा ठोकल्या आहेत.
advertisement
खरं तर हार्दिक पांड्याला आशिया कप 2025 दरम्यान म्हणजेच सप्टेंबरमध्ये दुखापत झाली होती.या दुखापतीतून पुनरागमन करत हार्दिक पांड्या 74 दिवसांनी म्हणजेच 2.5 महिन्यांनी मैदानात उतरला होता. यावेळी त्याने पहिल्याच सामन्यात खतरनाक खेळी केली. हार्दिक पांड्याने 28 बॉलमध्ये 59 धावांची नाबाद खेळी केली आहे. या खेळीत त्याने 6 चौकार आणि चार षटकार लगावले आहेत. भारताकडून केलेली ही सर्वाधिक खेळी होती.
टीम इंडियाची सूरूवात खूपच खराब झाली होती. गिल 4 वर तर अभिषेक 17 वर बाद झाला होता. त्याच्यानंतर सूर्या 12 वर झटपट बाद झाला.त्यानंतर तिलक वर्मा आणि अक्षर पटेलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्यांना मोठ्या धावा करता आल्या नाही.
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकिपर) , एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुथो सिपामला, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकिपर), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग
