टीम इंडिया फायनलला पोहोचणार का?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्रत्येक सामन्यात टीमला विजयांमुळे 12 पॉईंट्स, मॅच ड्रॉ झाल्यास 6 पॉईंट्स आणि पराभव झाल्यास शून्य पॉईंट मिळतात. भारताने आतापर्यंत 8 टेस्ट खेळल्या आहेत, ज्यात 4 विजयांसह भारताने 52 पॉईंट्स मिळवले आहेत, त्यामुळे त्यांची विजयी टक्केवारी 54.17 टक्के एवढी आहे. मागच्या WTC सत्रांवर नजर टाकली तर फायनलला पोहोचण्यासाठी टीमला 64 ते 68 टक्क्यांची विजयी टक्केवारी पुरेशी ठरते. फायनलच्या दोन टीमपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय टीमला या विजयी टक्केवारीपर्यंत पोहोचावे लागेल.
advertisement
भारताचे उरलेले सामने कुणाविरुद्ध?
भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या उरलेल्या मॅच महत्त्वाच्या ठरणार आहे. गुवाहाटीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटीमध्ये सीरिजची शेवटची मॅच होईल. यानंतर भारतीय टीम श्रीलंकेमध्ये त्यांच्या घरच्या मैदानात 2 टेस्ट मॅचची सीपिद खेळेल, जिथल्या खेळपट्ट्या स्पिन बॉलिंगसाठी अनुकूल आहेत. यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर 2 टेस्ट मॅच होतील, आणि शेवटी घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 टेस्ट मॅचची सीरिज होईल. या सीरिजनंतरच भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार का नाही? याचा निर्णय होईल.
टीम इंडिया फायनलला कशी पोहोचणार?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला उरलेल्या 10 पैकी किमान 7 मॅच जिंकाव्या लागणार आहेत, ज्यामुळे त्यांचे पॉईंट्स 136 होतील, तसंच त्यांची विजयी टक्केवारी 62.96% होईल. तसंच एकही सामना ड्रॉ झाला तर त्यांच्या खात्यात 140 पॉईंट्स (64.81%) होतील, जे फायनलमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसे ठरू शकतात. दरम्यान 8 विजय मिळवले तर भारताचं फायनलमधील स्थान निश्चित होईल, कारण त्यांच्या खात्यात 148 पॉईंट्स आणि विजयी टक्केवारी 68.52 एवढी असेल.
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा सामना जिंकला आणि नंतर श्रीलंकेचा 2-0 ने पराभव केला तसंच न्यूझीलंडसोबत 1-1 ने बरोबरी केली, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला किमान 3 विजय मिळवावे लागतील, तर त्यांचे 7-8 विजय होतील, पण यापेक्षा जास्त पराभव किंवा ड्रॉमध्ये टीम इंडियासमोरचा धोका वाढू शकतो.
