दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटी इथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गिलच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची कमान आता विकेटकीपर ऋषभ पंतकडे सोपवण्यात येईल. कोलकाता इथे पहिला कसोटी सामना टीम इंडिया आधीच हरल्याने, हा निर्णय भारतासाठी आणखी जोखमीचा ठरू शकतो. याचं कारण म्हणजे गिलने जेव्हा मैदान सोडलं तेव्हा कॅप्टन्सीची जबाबदारी पंतकडे देण्यात आली होती.
advertisement
गुवाहाटी कसोटी महत्त्वाची
२२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान गुवाहाटी इथे दुसरा कसोटी सामना होणारा आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. गिलला कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १५ नोव्हेंबरला बॅटिंग करताना त्याच्या मानेमध्ये ताण आला. त्याच दिवशी मॅच संपल्यानंतर त्याला तपासणीसाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांच्या देखरेखीखाली एक दिवस राहिल्यानंतर त्याला १६ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला.
BCCIकडून हेल्थ अपडेट
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने बुधवारी गिलच्या दुखापतीवर हेल्थ अपडेट दिली. त्यांनी सांगितले होते की, शुभमन गिल वेगाने बरा होत आहे. तो १९ नोव्हेंबर रोजी संघासोबत गुवाहाटीला रवाना होईल आणि मेडिकल टीम त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवेल. कोलकाता कसोटीत भारताच्या पहिल्या डावामध्ये वॉशिंग्टन सुंदर बाद झाल्यानंतर गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने सायमन हार्मेअरच्या पहिल्या दोन चेंडूंवर कोणताही धाव घेतली नाही. यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून खाते उघडले, मात्र याच दरम्यान स्वीप शॉट मारण्याच्या नादात त्याच्या मानेला झटका बसला आणि त्रास सुरू झाला. या त्रासामुळे फिजियो मैदानात आले आणि गिल त्यांच्यासोबत लगेचच बाहेर निघून गेला. त्याला स्कॅनसाठी स्टेडियमवरून एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मैदानातून बाहेर पडताना त्याच्या मानेला Brace लावलेला दिसला होता.
