चार दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला
पीटीआय वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभमन गिलला पुढील चार दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, त्यामुळे तो बुधवारी गुवाहाटीला जाणाऱ्या संघासोबत प्रवास करण्याची शक्यता नाही. बारसापारा स्टेडियमवर होणाऱ्या या दुसऱ्या 'करो या मरो' मॅचमध्ये तो खेळू शकणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात असल्याने आता टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये टेन्शनचं वातावरण आहे.
advertisement
बुधवारी अंतिम निर्णय?
शुभमनला मानेचा तीव्र त्रास आहे आणि दुखापतीबद्दल अधिक तपशील देण्याची आम्हाला परवानगी नाही. त्याला सतत मानेचा पट्टा घालावा लागेल, असं पीटीआयला सुत्रांनी सांगितलंय. परंतु, त्याच्या प्रगतीवर दररोज लक्ष ठेवलं जात आहे आणि मंगळवारपर्यंत अंतिम चित्र स्पष्ट होईल, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे बुधवारी टीम इंडियामध्ये मोठा निर्णय होईल, अशी शक्यता आहे.
शुभमन नाही मग, टीम इंडियाचा कॅप्टन कोण?
शुभमन गिल जर गुवाहटी कसोटी खेळणार नसेल तर कॅप्टन कोण? असा सवाल विचारला जात आहे. शुभमन गिलच्या जागी व्हाईस कॅप्टन ऋषभ पंत याच्याकडे जबाबदारी दिली जाऊ शकते. मात्र, कोलकाता कसोटीमध्ये ऋषभने केलेल्या चुका पाहता त्याला कॅप्टन्सी सोपवणं योग्य आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
शुभमनच्या जागेवर कोण खेळणार?
जर शुभमन गिल मॅचमधून बाहेर झाला, तर संघात साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कलसारखे पर्याय उपलब्ध आहेत. साई सुदर्शनने वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्लीमध्ये 87 धावा केल्या होत्या. तसेच, नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका 'ए' विरुद्धच्या चार डावांमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 32 होती. त्यामुळे दोघांपैकी संधी कुणाला मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
