खरं तर टीम इंडियाचा उप कर्णधार शुभमन गिल टी20 फॉरमॅटमध्ये अपयशी ठरताना दिसतो आहे. त्याच्याकडून सर्वोतम कामगिरी होत नाही.त्याच्या बॅटीतून धावाच निघत नाही.त्यामुळे अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी शुभमन गिलला बसवून त्याच्या जागी संजू सॅमसनला खेळवा,अशी मागणी जोर धरते आहे. अशीच मागणी आता आणखी एका दिग्गज क्रिकेटपटूंनी केले आहे.
हा दिग्गज क्रिकेटपटू दुसरा तिसरा कूणी नसून मोहम्मद कैफ आहे. शुभमन गिल इतका अपयशी ठरताना देखील त्याला टीम मॅनेजमेंट पाठींबा देते आहे. पण आता गिलच्या जागी संजू सॅमसनला संधी द्यावी, कारण त्याला पुरेशी संधी मिळाली नसल्याचे मत मोहम्मद कैफने नोंदवले आहे.
advertisement
शुभमन गिलच्या खेळीवर बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला, "तो कसा बाद होतोय, स्लिपमध्ये आऊट होतोय, कधी चुकीचा शॉर्ट खेळून आऊट होतो आहे.त्याने सर्वकाही करून पाहिले आहे. पण मला वाटते की त्याला विश्रांती देण्याची आणि इतर खेळाडूंना आजमावण्याची वेळ आली आहे.
संजू सॅमसन हा एक उच्च दर्जाचा खेळाडू आहे.त्याला पुरेशा संधी मिळालेल्या नाहीत. त्यामुळे दुटप्पीपणा करू नका, पकर्णधारांनाही यापूर्वी वगळण्यात आले आहे. जर गिलला विश्रांती देऊन दुसऱ्या कोणाला तरी संघात आणणे संघाच्या हिताचे असेल तर त्यात काहीही गैर नाही,असे मोहम्मद कैफ त्याच्या युट्यूब चॅनलवर बोलला आहे.
2025 मध्ये गिलला कसोटी आणि एकदिवसीय संघात कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आणि त्यानंतर टी20 संघातही उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. पंजाबच्या या क्रिकेटपटूच्या खांद्यावर जबाबदारीचा जास्त भार असल्याने अखेर फलंदाजीमध्ये त्याची कामगिरी खराब होत असल्याचे कैफला वाटते. व्यवस्थापनाने पुरेसा संयम बाळगायला हवा होता आणि हळूहळू नेतृत्वाची जबाबदारी गिलकडे सोपवायला हवी होती, असे कैफने म्हटले आहे.
“मी हे आधीही सांगितले आहे.शुभमन गिलला एकाच वेळी खूप जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. कसोटी कर्णधारपद, एकदिवसीय कर्णधारपद, टी-२० उपकर्णधारपद कोणताही खेळाडू एकाच वेळी इतके भार सहन करू शकत नाही. ते शक्य नाही. जबाबदाऱ्या हळूहळू सोपवल्या पाहिजेत,” असे कैफ पुढे म्हणाला.
दरम्यान आता रविवारी पार पडणाऱ्या सामन्यात शुभमन गिलच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
