स्कोअरबोर्डवर एक रन असतानाच भारताचे दोन्ही ओपनर पॅव्हेलियनमध्ये परतले, त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने किल्ला लढवला, पण एका बाजूने विकेट जातच होत्या. सुंदरने सर्वाधिक 31 रन केले तर अक्षर पटेलने 26 रनची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून सिमन हार्मरने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर मार्को यानसन आणि केशव महाराजला 2-2 विकेट घेण्यात यश आलं. एडन मार्करमनेही 1 विकेट घेतली.
advertisement
बुमराह-बऊमाचा वाद मिटला
दरम्यान मॅच संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमा आणि जसप्रीत बुमराह यांच्यातला वाद मिटला आहे. बुमराहने जवळ जाऊन बऊमाला हस्तांदोलन केलं. याच मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये बुमराह बऊमाला बुटका म्हणाला होता. एलबीडब्ल्यूचा डीआरएस घ्यायचा का नाही? याबद्दल टीम इंडियाची चर्चा सुरू होती, तेव्हा बुमराह डीआरएस घे, हा बुटका आहे, असं कर्णधार गिलला म्हणाला. बुमराहचं हे वक्तव्य स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झालं, यानंतर मोठा वाद निर्माण झाला.
बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचा अपमान केला असून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांनी केली, पण आता मॅच संपल्यानंतर बुमराह बऊमाला जाऊन भेटला आणि त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला हस्तांदोलनही केलं.
