जसप्रीत बुमराहने पहिल्या इनिंगमध्ये दोन भेदक यॉर्कर टाकले, वेस्ट इंडिजच्या बॅटरना बुमराहचे हे यॉर्कर झेपले नाहीत आणि बॉल थेट स्टम्पवर जाऊन आदळला. बुमराहने टाकलेल्या या बॉलमुळे स्टम्प मुळासकट उघडले गेले, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बुमराहच्या यॉर्करमुळे वेस्ट इंडिजचे बॅटर चांगलेच अडचणीत आले. वेस्ट इंडिजकडून या सामन्यात सगळ्यात मोठी इनिंग जस्टिन ग्रीव्सने खेळली. ग्रीव्स एका बाजूने रन करत होता, पण तेव्हा बुमराहने त्याला खतरनाक यॉर्कर टाकला, ज्यामुळे वेस्ट इंडिजने त्यांची 8वी विकेट गमावली. यानंतर पुढच्याच ओव्हरला त्याने आणखी एक यॉर्तर टाकला, जोहान लेयनेला हा बॉलही खेळता आला नाही आणि स्टम्प खेळपट्टीच्या बाहेर आले.
advertisement
दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 121/2 एवढा झाला आहे. केएल राहुल 53 रनवर तर कर्णधार शुभमन गिल 18 रनवर खेळत आहेत. यशस्वी जयस्वाल 36 रनवर आणि साई सुदर्शन 7 रनवर आऊट झाले. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया 41 रननी पिछाडीवर आहे. वेस्ट इंडिजकडून जेडेन सिल्स आणि रोस्टन चेस यांना 1-1 विकेट मिळाली.
भारताची प्लेयिंग इलेव्हन
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज