TRENDING:

IND VS AUS : टीम इंडियाच्या तीन मैत्रिणींनी मॅच फिरवली, ऑस्ट्रेलियाला घरात जाऊन हरवलं, टी20 मालिका खिशात

Last Updated:

अॅडलेड ओव्हलच्या मैदानात पार पडलेल्या शेवटच्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव केला आहे.या सामन्यात भारताने दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रे्लिया 159 धावांपर्यंत मजल मारू शकली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India vs Australia 3rd T20i : अॅडलेड ओव्हलच्या मैदानात पार पडलेल्या शेवटच्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव केला आहे.या सामन्यात भारताने दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रे्लिया 159 धावांपर्यंत मजल मारू शकली होती.त्यामुळे भारताने हा सामना 17 धावांनी जिंकला आहे.भारताच्या या विजयात तीन मैत्रिणींनी मोलाची भूमिका बजावली होती.तसेच या विजयासह भारताने तीन सामन्यांची टी20 मालिका 2-1 ने जिंकली आहे.
ind women  defeat aus women
ind women defeat aus women
advertisement

टीम इंडियाने दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सूरूवात खराब झाली होत. कारण जॉर्जिया वॉल 10 आणि बेथ मुनी 6 वर बाद झाली होती.त्यानंतर फोईब लिचफिल्डने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण ती 26 वर बाद झाली होती. त्याच्यानंतर एलीस पेरी 1 वर बाद झाली होती. ऑस्ट्रेलियाचे 63 धावांवर चार तीन विकेट पडले होते.

advertisement

त्याच्यानंतर अॅश्ले गार्डनर आणि जॉर्जिया वेरहाम मैदानात होती.यावेळी गार्डनरने एकाबाजूने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला होता. पण दुसऱ्या बाजूने विकेट पडत होते.गार्डनर जिथपर्यंच मैदानात होती तिथपर्यंत ऑस्ट्रेलिया सामना जिंकण्याची आशा होती.या दरम्यान तिने आपलं अर्धशतकही ठोकलं होतं. पण नंतर षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाऊन्ड्री लाईनवर जेमीमा रॉड्रीग्जने तिची जबरदस्त कॅच घेऊन तिला बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून एकट्या अॅशले गार्डनरने 57 धावा केल्या होत्या.गार्डनर बाद होताच विकेटची लाईनच लागली. शेवटी ऑस्ट्रेलिया 20 ओव्हरमध्ये फक्त 9 विकेट गमावून 159 धावाच करू शकली होती.त्यामुळे भारताने हा सामना 17 धावांनी जिंकला होता.

advertisement

टीम इंडियाकडून श्री चरण, आणि श्रेयांका पाटीलने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या होत्या.तर अरूंधती रॉय 2 आणि रेणुका ठाकूरने एक विकेट घेतली होती.

भारताच्या डावाबद्दल बोलायचं झालं तर स्मृती मानधनाने 55 बॉलमध्ये 82 धावांची वादळी खेळी केली होती.या खेळीत तिने 3 षटकार आणि 8 चौकार मारले होते.त्याचसोबत जेमीमा रॉड्रीग्जने 59 धावांची खेळी केली होती.या खेळीच्या बळावर भारताने 6 विकेट गमावून 176 धावा केल्या होत्या.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

दरम्यान टीम इंडियाची स्मृती मानधना आणि जेमीमा रॉड्रीग्जची अर्धशतकीय खेळी आणि श्रेयांका पाटीलच्या विकेट टेकींग गोलंदाजीमुळे टीम इंडियाने हा सामना जिंकला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेच 2-1 ने आघाडी घेत मालिका जिंकली आहे आणि ऑस्ट्रेलियाला घरात जाऊन हरवलं आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND VS AUS : टीम इंडियाच्या तीन मैत्रिणींनी मॅच फिरवली, ऑस्ट्रेलियाला घरात जाऊन हरवलं, टी20 मालिका खिशात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल