यंदाच्या आयपीएल हंगामात महेंद्र सिंह धोनी चेन्नईचा कर्णधार नसेल. धोनीने त्याच्या जागी २७ वर्षीय स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडला चेन्नईचं नेतृत्व सोपवलं. दरम्यान आयपीएलने सोशल मीडियावर सर्व दहा कर्णधारांचा फोटो शेअर केला आहे.कर्णधारांच्या फोटोमध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन दिसून येत नाही. त्यामुळे पंजाबनेसुद्धा कर्णधार बदलला का अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू झाली आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनच्या जागी जितेश शर्मा फोटोशूटला उपस्थित होता.
advertisement
आयपीएलने कर्णधारांचा फोटो शेअर करताना शिखर धवनबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. फोटो कॅप्शनमध्ये म्हटलं की, सर्व ९ संघाचे प्रतिनिधी म्हणून कर्णधार आहेत. पण पंजाबचा संघाचा प्रतिनिधी म्हणून उपकर्णधार जितेश शर्मा उपस्थित आहे.
फोटोशूटवेळी शिखर धवन काही कारणांमुळे उपस्थित राहू शकला नाही. त्याच्या जागी उपकर्णधार जितेश शर्मा उपस्थित होता. त्यामुळे आयपीएलमध्ये पंजाबचा कर्णधार शिखर धवनच असणार हे स्पष्ट झालं. गेल्या हंगामात धवनकडे नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने १२ पैकी ४ सामने जिंकले तर ८ गमावले आहेत.