खराब फिल्डिंगचा फटका
या सामन्यात चेन्नईच्या फिल्डरनी सोडलेल्या कॅचवर कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाराजी व्यक्त केली. 'गेल्या चार सामन्यांमध्ये, हा एकमेव फरक आहे. तो खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही कॅच सोडतो तेव्हा तोच बॅटर 20-25-30 रन जास्त काढतो. आरसीबीविरुद्धचा सामना सोडला तर आम्ही चेस करताना दोन-तीन हिट्सनी कमी पडलो. प्रियांशच्या बॅटिंगचं कौतुक, त्याने संधीचा फायदा घेतला. प्रियांशने जोखीम पत्करून बॅटिंग केली. आम्ही विकेट घेतल्या तरी त्यांनी रनची गती कायम ठेवली. आमची बॉलिंग चांगली झाली असती, तर आम्ही 10-15 रन कमी देऊ शकलो असतो कॅच सोडणंही एक कारण होतं', असं ऋतुराज म्हणाला.
advertisement
'बॅटिंगमध्ये आमची कामगिरी चांगली झाली, आम्हाला हेच हवं होतं. आमच्यासाठी पॉवरप्ले उत्तम होता. जडेजासारखा फिनिशर असल्यामुळे त्याच्याकडून तुम्ही अपेक्षा करता. फिल्डरना फिल्डिंगचा आनंद घ्यावा लागेल, जर तुम्ही घाबरलात तर तुमचे कॅच सुटतील. आम्ही फिल्डिंगवर काम करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण यात आम्हाला यश मिळत नाहीये', अशी कबुली ऋतुराज गायकवाडने दिली.
पंजाब किंग्सविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नई सुपरकिंग्स पॉइंट्स टेबलमध्ये 9व्या क्रमांकावर आहे. चेन्नईने आतापर्यंत 5 पैकी 4 सामने गमावले आहेत, त्यांचा नेट रनरेटही (-0.889) खूप खराब आहे.