अभिषेक शर्मा आणि विघ्नेश राठी यांच्यात मैदानामध्ये राडा होत असतानाच दोन्ही अंपायर आणि लखनऊचे इतर खेळाडू मध्ये पडले आणि त्यांनी भांडण शांत केलं. अभिषेक शर्मा संतापलेला असताना विघ्नेश राठीनेही त्याला प्रत्युत्तर दिलं, त्यामुळे काही काळ मैदानामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. लखनऊने दिलेल्या 206 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने 20 बॉलमध्ये 59 रनची वादळी खेळी केली, यामध्ये 6 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता.
advertisement
आयपीएलच्या या मोसमात विघ्नेश राठी त्याच्या विकेट घेतल्यानंतर सही करण्याच्या सेलिब्रेशनमुळे चांगलाच वादात सापडला आहे. याआधीही अशाप्रकारे सेलिब्रेशन केल्यामुळे त्याला दंड भरावा लागला आहे. आता तर त्याच्या या सेलिब्रेशनमुळे मैदानामध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
Fight between Digvesh Rathi and Abhishek Sharma 😳 pic.twitter.com/8ngcvpnIVK
—