दिग्वेश राठीचं निलंबित
यंदाच्या हंगामातील हे त्याचं तिसरं Level 1 चे उल्लंघन होतं. यापूर्वी त्याला पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात (१ एप्रिल २०२५) एक आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात (४ एप्रिल २०२५) दोन डिमेरिट गुण मिळाले होते. आता त्याचे एकूण डिमेरिट गुण पाच झाले आहेत. आयपीएल नियमांनुसार, पाच डिमेरिट गुण झाल्यास खेळाडूला एका सामन्यासाठी निलंबित केले जाते. त्यामुळे दिग्वेश सिंग आता २२ मे २०२५ रोजी अहमदाबाद येथे गुजरात टायटन्सविरुद्ध होणाऱ्या एलएसजीच्या पुढील सामन्यात खेळू शकणार नाही. Level 1 च्या उल्लंघनासाठी सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.
advertisement
आचारसंहितेचं उल्लंघन
दुसरीकडे, याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्मा यालाही आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मानधनाच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामातील हे त्याचे पहिले Level 1 चे उल्लंघन होते आणि त्यामुळे त्याला एक डिमेरिट गुण मिळाला आहे. Level 1 च्या उल्लंघनासाठी सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.
लखनऊ सुपर जायंट्सला मोठा फटका
एकाच सामन्यात दोन खेळाडूंवर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई झाल्याने आयपीएलमधील शिस्त आणि नियमांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दिग्वेश सिंगच्या निलंबनाचा लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्या पुढील सामन्यात नक्कीच फटका बसू शकतो.