17 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला मुंबईने हार्दिक पांड्याच्या रुपात पाचवी विकेट गमावली. हार्दिक पांड्याची विकेट गेली तेव्हा मुंबईचा स्कोअर 123 रन होता, पण पुढच्या 21 बॉलमध्ये सूर्यकुमार यादव आणि नमन धीर यांनी वादळी खेळी केली. या 21 बॉलमध्ये सूर्या आणि नमन धीर यांनी 57 रन काढल्या आणि मुंबईचा स्कोअर 180 पर्यंत पोहोचवला, या पार्टनरशीपमुळे मुंबईचा दणदणीत विजय झाला.
advertisement
सूर्यकुमार यादवने 43 बॉलमध्ये नाबाद 73 तर नमन धीरने 8 बॉलमध्ये नाबाद 24 रन केले. याशिवाय तिलक वर्माने 27, रिकलटनने 25 आणि विक जॅक्सने 21 रनच्या महत्त्वपूर्ण खेळी केल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने 2 विकेट घेतल्या. दुष्मंता चमीरा, मुस्तफिजूर आणि कुलदीप यादवला एक-एक विकेट घेण्यात यश आलं.
मुंबईने दिलेलं 181 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या दिल्लीचा 18.2 ओव्हरमध्ये 121 रनवर ऑलआऊट झाला. मुंबईकडून मिचेल सॅन्टनरने 4 ओव्हरमध्ये फक्त 11 रन देऊन 3 विकेट घेतल्या, तर बुमराहने 3.2 ओव्हरमध्ये 12 रन देऊन 3 विकेट मिळवल्या. याशिवाय ट्रेन्ट बोल्ट, दीपक चहर, विल जॅक्स, आणि कर्ण शर्मा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. दिल्लीकडून समीर रिझवीने सर्वाधिक 39 रन केल्या तर विपराज निगमने 20 आणि आशुतोष शर्माने 18 रनची खेळी केली.