मुंबईला टॉप-२ मध्ये स्थान मिळवायचे असेल तर...
सध्याच्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्स १६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यांच्याकडे आता फक्त एकच लीग सामना शिल्लक आहे, जो त्यांना २६ मे रोजी पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध खेळायचा आहे. जर मुंबईला टॉप-२ मध्ये स्थान मिळवायचे असेल, तर त्यांना पंजाब किंग्जविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकून १८ गुणांपर्यंत पोहोचणे अनिवार्य आहे. मात्र, केवळ विजय पुरेसा नाही. त्यांना असेही आशा करावी लागेल की, गुणतालिकेतील सध्याचे आघाडीचे संघ - गुजरात टायटन्स (GT), पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) - यांच्यापैकी किमान दोन संघांनी त्यांचे उर्वरित सामने गमावले पाहिजेत.
advertisement
दोन कॅप्टन मुंबईच्या मदतीला धावणार?
मुंबई इंडियन्सला फायनल गाठायची असेल तर दिल्ली कॅपिटल्सला पंजाब किंग्जला हरवावं लागणार आहे. तसेच उद्या लगेच लखनऊला बंगळुरूच्या मदतीला धावून जावा लागेल. लखनऊ सुपर जाएन्ट्सने आरसीबीचा पराभव केला तर मुंबईला टॉपवर येण्याची संधी असेल. मुंबई इंडियन्स बाकी पंजाबला हरवण्याचं काम आरामात करू शकते, असं समीकरण जुळलं तर मुंबईला क्वालिफायर -१ मध्ये विजय मिळवून थेट फायनल गाठता येईल.
मुंबई इंडियन्स क्वालिफायर-1 खेळणार?
सध्या गुजरात टायटन्स १८ गुणांसह आघाडीवर आहेत, तर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रत्येकी १७ गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. मुंबईचा नेट रन रेट (NRR) चांगला असल्यामुळे, जर काही संघांचे गुण १८ वर सारखे झाले, तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. परंतु, ही वाटचाल सोपी नाही. जर मुंबई आपला शेवटचा सामना हरले, तर त्यांचे टॉप-२ मध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगेल आणि त्यांना थेट एलिमिनेटर सामना खेळावा लागेल. त्यामुळे, मुंबई इंडियन्ससाठी 'क्वालिफायर १' ची आशा अजूनही जिवंत असली तरी, ती पूर्णतः इतर संघांच्या निकालांवर आणि त्यांच्या शेवटच्या सामन्यातील दमदार कामगिरीवर अवलंबून आहे.