गुरूवारच्या सामन्यात लखनऊ सूपर जाएंटसने प्रथम फलंदाजी करताना 236 धावा ठोकल्या आहेत.या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स 202 धावांपर्यंतच मजल मारू शकली होती.त्यामुळे गुजरातचा पराभव झाला होता. पंतने केलेल्या या पराभवानंतर आता गिलचं गणित बिघडलं आहे.
खरं तर कालच्या पराभवानंतर शुभमन गिल 18 गुणांसह टेबल टॉपला कायम राहिला आहे.पण पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या रॉयल चँलेंजर्स बंगळरू आणि पंजाब किंग्जचे सध्या 17 गुण आहेत.या गुणांसह दोन्ही संघाचे अजून दोन सामने उरले आहेत.या दोन्ही सामन्यात दोन्ही संघाने विजय मिळवल्यास दोन्ही संघ 21वर पोहोचतील.आणि गुजरात एक सामना जिंकून जास्तीत जास्त 20 गुणापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे गुजरात थेट तिसऱ्या स्थानी फेकला जाईल.
advertisement
त्यामुळेच पंतने दिलेल्या एका हारमुळे गिलचा मोठा गेम झाला आहे. जर गुजरातने लखनऊ विरूद्ध सामना जिंकला असता तर ती फायनलपर्यंत टेबल टॉपला कायम राहिली असती.पण प्लेऑफमधून बाहेर पडता पंतने गिलचा मोठा गेम केला आहे.
मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचं झालं तर गुणतालिकेत हा संघ चौथ्या स्थानी असून त्यांचे गुण 16 आहे.जर मुंबईने त्यांचा शेवटचा सामना जिंकला तर मुंबईचे 18 गुण होतील.अशाप्रकारे मुंबई चौथ्या स्थानी कायम राहिलं.