आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये सध्या मुंबई चौथ्या आणि दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे. मुंबईचे 12 सामन्यांमध्ये 7 विजयांसह 14 पॉईंट्स आहेत, तर दिल्लीने 12 सामन्यांमध्ये 6 मॅच जिंकल्या आणि त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे त्यांच्या खात्यात 13 पॉईंट्स आहेत. प्ले-ऑफच्या चौथ्या स्थानासाठी मुंबई आणि दिल्ली यांच्यामध्येच स्पर्धा असली तरी या दोन पैकी कोणती टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचणार हे तीन मॅच ठरवणार आहेत.
advertisement
मुंबई-दिल्लीची थेट लढत
बुधवार 21 मे रोजी मुंबई आणि दिल्ली यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. या सामन्यामध्ये मुंबईचा विजय झाला तर मुंबई प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी चौथी टीम ठरेल, कारण मुंबईचे 16 पॉईंट्स होतील तर दिल्लीचे 13 सामन्यांमध्ये 13 पॉईंट्सच राहतील, त्यामुळे शेवटचा पंजाबविरुद्धचा सामना जिंकला तरी दिल्ली जास्तीत जास्त 15 पॉईंट्सपर्यंत पोहोचू शकते, पण मुंबईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा विजय झाला तर प्ले-ऑफची रेस आणखी रंजक होईल
पंजाब-दिल्लीचा सामना
दिल्लीने मुंबईचा पराभव केला तर 24 मे रोजी होणारी दिल्ली आणि पंजाब यांच्यातली मॅच रोमांचक होईल. मुंबईचा पराभव केल्यानंतर दिल्लीने पंजाबलाही धूळ चारली तर त्यांचे 17 पॉईंट्स होतील, या परिस्थितीमध्ये मुंबईचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न भंगेल, कारण दिल्ली दोन्ही मॅच जिंकून 17 पॉईंट्सपर्यंत जाईल आणि मुंबईने शेवटचा सामना जिंकला तरी त्यांचे 16 पॉईंट्सच राहतील.
पंजाब-मुंबई मॅच ठरवणार प्ले-ऑफची जागा
दिल्लीचा मुंबईविरुद्ध विजय झाला आणि पंजाबविरुद्ध पराभव पत्करावा लागला तर त्यांना मुंबई आणि पंजाब यांच्यामध्ये होणाऱ्या 26 मे च्या सामन्यावर अवलंबून राहावं लागेल. या सामन्यात पंजाब किंग्स मुंबई इंडियन्सचा पराभव करेल, यासाठी दिल्लीला प्रार्थना करावी लागेल, पण या सामन्यात मुंबईचा विजय झाला तर दिल्लीचं आव्हान संपुष्टात येईल, पण हा सामना पंजाबने जिंकला तर दिल्ली प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणारी चौथी टीम ठरेल.