ग्रीनला 18 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम नाही
IPL च्या गव्हर्निंग काऊंसिलने नुकताच एक नियम लागू केला आहे, ज्यामुळे ग्रीनला 18 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळणार नाही. मागील वर्षीच्या मेगा ऑक्शनमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतलेल्या ऋषभ पंतचा विक्रम जरी ग्रीनने मोडला, तरी ही रक्कम ग्रीन ला पूर्ण मिळणार नाही. या नव्या नियमानुसार, परदेशी खेळाडूचा पगार 18 कोटी रुपये किंवा मोठ्या लिलावात सर्वाधिक मिळालेली किंमत यापैकी जो आकडा कमी असेल, तेवढेच पैसे खेळाडूला मिळणार आहेत.
advertisement
सोप्या भाषेत समजायचं असेल तर....
सोप्या भाषेत समजायचं असेल तर, जर कॅमरुन ग्रीनला यंदाच्या हंगामात 20 कोटींची बोली लागली तर तर कॅमरून ग्रीनला 18 कोटींच मिळतील. तसेच दर कॅमरून ग्रीनला 32 कोटींची बोली लागली तर तरी देखील त्याला 18 कोटीच मिळतील. तर उर्वरित रक्कम प्लेयर्स वेलफेअर फंडमध्ये जाईल. त्याचबरोबर तर कॅमरून ग्रीनला 16 कोटींची बोली लागली तर त्याला 16 कोटीच मिळणार आहेत.
परदेशी खेळाडू मुद्दामहून मिनी लिलावात...
दरम्यान, बीसीसीआय आणि फ्रँचायझी प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा नियम तयार करण्यात आला. मिनी ऑक्शनमध्ये असंतुलनाचा फायदा घेऊन काही परदेशी खेळाडू मुद्दामहून मिनी लिलावात भाग घेतात अन् मोठी बोली मिळवत असल्याची फ्रँचायझीची तक्रार होती. आयपीएल 2024 च्या लिलावामध्ये मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी मिनी आयपीएलमध्ये उडी घेत मोठी रक्कम कमावली होती, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
