बीसीसीआयच्या ब्रँड कास्ट इंजिनियरचा मुंबईत गूढ मृत्यू
बीसीसीआयच्या ब्रँड कास्ट इंजिनियरचा मुंबईत गूढ मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तो आयपीएलसाठी मुंबईमध्ये आला आहे. विल्यम लेग्नफोर्ड असं या ब्रँड कास्ट इंजिनियर नाव आहे. तो मुंबईच्या प्रसिद्ध ट्रायडन्टमध्ये राहत होता. 24 मार्चपासून तो इथं राहत होता. 29 मार्चला मॅच संपल्यानंतर रूम नंबर 2715 मध्ये आले होते. 30 मार्च रोजी जेव्हा रिसेप्शनिस्टने त्यांना फोन केला, तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. विल्यम्स लेग्नफोर्ड मूळचे ब्रिटिश नागरिक आहेत.
advertisement
मास्टर चावीने रुम उघडली अन्...
हॉटेल कर्मचाऱ्यांना रुममध्ये गेल्यावरही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मास्टरचावीने रुम उघडल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांना तातडीने डॉक्टरांना बोलवलं असताना विल्यम लेग्नफोर्ड यांना मृत घोषित करण्यात आलं. या प्रकरणात मरिन ड्राईव्ह पोलीस चौकीत मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
KKR vs MI : हार्दिकचा 'नो लूक टॉस' अन् वाद पेटला! अजिंक्य रहाणेला कळायच्या आत झाला गेम? Video चर्चेत
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
दरम्यान, पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही. वैद्यकीय अहवालानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येतीये, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
