13 एप्रिल 2026 रोजी हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात आठ ‘डबल-हेडर’ सामने असतील. दुपारचे सामने दुपारी 3:30 वाजता सुरू होतील, तर सायंकाळचे सामने 7:30 वाजता खेळवले जातील.
advertisement
पंजाब किंग्स आपले घरचे सामने न्यू चंदीगड आणि धर्मशाला येथे खेळणार असून, यामध्ये धर्मशालामध्ये तीन सामने होणार आहेत. राजस्थान रॉयल्स जयपूरमध्ये चार सामने खेळणार आहे. आरसीबी दुसऱ्या टप्प्यातील आपले तीन सामने बेंगळुरूत आणि दोन सामने रायपूरमध्ये खेळणार आहे.
लीग स्टेज संपल्यानंतर पॉईंट्स टेबलमधल्या 4 टीम प्ले-ऑफमध्ये प्रवेश करतील. 31 मे रोजी आयपीएल 2026 ची फायनल खेळवली जाणार आहे. देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, यातल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आसाम या राज्यांमध्ये आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत, त्यामुळे आधी फक्त पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा केल्यानंतर आता आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने पूर्ण स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 24 मे रोजी आयपीएल 2026 च्या ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. प्ले-ऑफ आणि फायनल कुठे होणार? याची घोषणा अजून करण्यात आलेली नाही.
