TRENDING:

MI vs CSK चा डबल धमाका, पलटनच्या मॅच कधी अन् कुठे? मुंबई इंडियन्सचं पूर्ण शेड्यूल आताच सेव्ह करा!

Last Updated:

आयपीएल 2026 च्या संपूर्ण वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. वेगवेगळ्या राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांमुळे सुरूवातीला आयपीएलच्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आयपीएल 2026 च्या संपूर्ण वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. वेगवेगळ्या राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांमुळे सुरूवातीला आयपीएलच्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली होती, पण आता निवडणूक आयोगाने मतदान आणि मतमोजणीच्या तारखा जाहीर केल्यानंतर आयपीएलचं पूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा पहिला सामना 28 मार्चला गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.
MI vs CSK चा डबल धमाका, पलटनच्या मॅच कधी अन् कुठे? मुंबई इंडियन्सचं पूर्ण शेड्यूल आताच सेव्ह करा!
MI vs CSK चा डबल धमाका, पलटनच्या मॅच कधी अन् कुठे? मुंबई इंडियन्सचं पूर्ण शेड्यूल आताच सेव्ह करा!
advertisement

28 मार्चला सुरू होणाऱ्या आयपीएल 2026 च्या ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना 24 मे रोजी होणार आहे, यानंतर टॉप-4 टीम प्ले-ऑफ आणि फायनल खेळतील. प्ले-ऑफ आणि फायनलच्या तारखा आणि ठिकाणांची घोषणा अजून करण्यात आलेली नाही.

मुंबई इंडियन्सचे सामने

सर्वाधिक 5 वेळा आयपीएल जिंकणारी मुंबई इंडियन्स या मोसमातही एकूण 14 सामने खेळणार आहे, यातले 7 सामने मुंबई इंडियन्स त्यांचं होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर खेळेल. या मोसमातला मुंबईचा पहिला सामना केकेआरविरुद्ध रविवार 29 मार्चला होईल, तर ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना मुंबई 24 मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबईमध्येच खेळेल. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात एकही सामना पहिल्या टप्प्यात ठेवण्यात आला नव्हता, पण दुसऱ्या टप्प्यात या दोन्ही टीम दोन वेळा भिडणार आहेत.

advertisement

सामना क्र. तारीख वार वेळ होम टीम अवे टीम मैदान
1 29-मार्च-26 रविवार 7:30 PM मुंबई इंडियन्स कोलकाता नाईट रायडर्स मुंबई
2 04-एप्रिल-26 शनिवार 3:30 PM दिल्ली कॅपिटल्स मुंबई इंडियन्स दिल्ली
3 07-एप्रिल-26 मंगळवार 7:30 PM राजस्थान रॉयल्स मुंबई इंडियन्स गुवाहाटी
4 12-एप्रिल-26 रविवार 7:30 PM मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू मुंबई
5 16-एप्रिल-26 गुरुवार 7:30 PM मुंबई इंडियन्स पंजाब किंग्स मुंबई
6 20-एप्रिल-26 सोमवार 7:30 PM गुजरात टायटन्स मुंबई इंडियन्स अहमदाबाद
7 23-एप्रिल-26 गुरुवार 7:30 PM मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्स मुंबई
8 29-एप्रिल-26 बुधवार 7:30 PM मुंबई इंडियन्स सनरायझर्स हैदराबाद मुंबई
9 02-मे-26 शनिवार 7:30 PM चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्स चेन्नई
10 04-मे-26 सोमवार 7:30 PM मुंबई इंडियन्स लखनऊ सुपर जायंट्स मुंबई
11 10-मे-26 रविवार 7:30 PM रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू मुंबई इंडियन्स रायपूर
12 14-मे-26 गुरुवार 7:30 PM पंजाब किंग्स मुंबई इंडियन्स धर्मशाळा
13 20-मे-26 बुधवार 7:30 PM कोलकाता नाईट रायडर्स मुंबई इंडियन्स कोलकाता
14 24-मे-26 रविवार 3:30 PM मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स मुंबई

advertisement

मुंबई इंडियन्सची टीम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तब्बल 6 वर्षांची प्रतीक्षा, मराठी चित्रपटसृष्टीसाठी हक्काचं थिएटर, भारत माता सिनेमा पुन्हा सुरू, Video
सर्व पहा

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिन्झ, शरफेन रदरफोर्ड, रेयान रिकलटन, क्विंटन डिकॉक, दानिश मालेवार, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सॅन्टनर, राज अंगद बावा, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत, कॉर्बिन बॉश, विल जॅक्स, शार्दुल ठाकूर, ट्रेन्ट बोल्ट, मयंक मार्कंडे, दीपक चहर, अश्विनी कुमार, रघू शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद इजहार, अल्लाह गझनफर

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs CSK चा डबल धमाका, पलटनच्या मॅच कधी अन् कुठे? मुंबई इंडियन्सचं पूर्ण शेड्यूल आताच सेव्ह करा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल