आयपीएल सामन्यांदरम्यान जर तीन पेक्षा जास्त दिवसांचं अंतर असेल तर कोहली लंडनला जाईल आणि मॅचच्या ठीक आधी परत येईल, असा दावाही या पोस्टमध्ये केला गेला होता. विराट कोहलीने या पोस्टचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आणि त्यावर हसणारी इमोजी पोस्ट केली होती. विराटने हा स्क्रीनशॉट इमोजीसह शेअर करून या वृत्ताचं खंडन केलं आहे. काही वेळानंतर विराटने ही पोस्ट डिलीट केली.
advertisement
भारताच्या टेस्ट आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झालेला विराट आता फक्त वनडे आणि आयपीएल खेळत आहे. आयपीएल 2026 आधी विराटने आरसीबीच्या पहिल्या ट्रेनिंग सेशनवेळी भारतीय खेळाडूंच्या छोट्या ग्रुपला संबोधित केलं आणि पुढच्या काही आठवड्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केलं.
काय म्हणाला विराट?
'आम्ही मागच्या दोन-तीन मोसमांपासून खूप मेहनत केली आहे. आता हे आणखी कठीण होणार आहे, कारण दुसऱ्या टीमही आपल्याविरुद्ध पूर्ण तयारी करून उतरणार आहे. आपण हे दिवस फुकट घालवू शकत नाही. आपल्याला सगळ्यांच्या पुढे राहावं लागणार आहे, त्यामुळे पूर्णपणे तयार व्हा. आपण ज्या सेशनमध्ये असू, त्यातलं एक मिनिटही फुकट घालवू नका. पुढचे अडीच महिने 120 टक्के द्या', असं विराट कोहली म्हणाला आहे. आयपीएल इतिहासात विराट कोहली हा सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे.
