केकेआर आयपीएल 2026 चा पहिला सामना 29 मार्चला मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार हर्षित राणा आयपीएलच्या संपूर्ण मोसमातून बाहेर झाला आहे. केकेआरने अजूनपर्यंत राणाची रिप्लेसमेंट म्हणून कोणत्या बॉलिंग ऑलराऊंडरला घ्यायचं? याचा निर्णय घेतलेला नाही. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या केकेआरला लवकरच हर्षित राणासाठी पर्यायी खेळाडू शोधावा लागणार आहे.
advertisement
हर्षित राणाने आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर त्याची टीम इंडियात एन्ट्री झाली. फास्ट बॉलर असलेला हर्षित राणा आठव्या किंवा नवव्या क्रमांकावर उत्कृष्ट बॅटिंगही करतो, त्यामुळे त्याला टीम इंडियामध्ये जागा मिळाली. मागच्या दोन वर्षांमध्ये हर्षित राणाने भारताकडून टी-20, वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्येही पदार्पण केलं. टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा हर्षित राणा हा ठराविक भारतीय खेळाडूंपैकी एक आहे.
हर्षित राणाचं रेकॉर्ड
हर्षित राणाने 2022 साली आयपीएलमध्ये पदार्पण केलं, तेव्हापासून त्याने 34 सामन्यांमध्ये 25.73 च्या सरासरीने आणि 9.51 च्या इकोनॉमी रेटने 40 विकेट घेतल्या आहेत. आयपीएल 2024 चा मोसम हर्षितसाठी टर्निंग पॉईंट ठरला. 2024 मध्ये हर्षितने 13 सामन्यांमध्ये 19 विकेट घेतल्या आणि केकेआरला ट्रॉफी जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. तर आयपीएल 2025 मध्ये त्याने 13 सामन्यांमध्ये 15 विकेट घेतल्या.
