TRENDING:

IPL ला दोन दिवस उरले असताना BCCI चा शॉकिंग निर्णय, 140 कोटी भारतीयांना झटका

Last Updated:

खरं तर 28 मार्च 2026 ला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर आयपीएलच्या 19 व्या सीझनचा पहिला मुकाबला हा सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IPL 2026 Openining ceremony Cancelled :  आयपीएल 2026 च्या हंगामाला येत्या 28 मार्च 2026 पासून सूरूवात होणार आहे. या हंगामातला पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहे. त्यामुळे या हंगामाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान ही लीग सूरू होण्यास दोन दिवसाचा अवधी शिल्लक असताना बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने 140 कोटी भारतीयांना मोठा धक्का बसला आहे.
IPL 2026
IPL 2026
advertisement

खरं तर 28 मार्च 2026 ला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर आयपीएलच्या 19 व्या सीझनचा पहिला मुकाबला हा सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातला हा पहिलाच सामना असल्याने ओपनिंग सेरेमनी हमखास होईल असे सर्वांना वाटत होते. पण यंदाच्या वर्षी ओपनिंग सेरेमनी होणार नाही आहे.त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.दरम्यान बीसीसीआयने अचानक ही ओपनिंग सेरेमनी रद्द का केली आहे? यामागचं नेमकं कारण काय आहे? हे जाणून घेऊयात.

advertisement

मागच्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलवर पहिल्यांदाच नाव कोरलं होतं.त्यामुळे आरसीबीने 28 मार्च 2025 ला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर व्हिक्ट्री परेड काढली होती. या व्हिक्ट्री परेडला इतकी गर्दी जमली होता की चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत 11 आरसीबी चाहत्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मागच्या वर्षी घडलेल्या या दु:खद घटनेमुळे आणि यंदाचा पहिला सामना देखील त्याच मैदानावर असल्याने बीसीसीआयने ओपनिंग सेरेमनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अशी ही रुग्णसेवा, छ. संभाजीनगरमध्ये गरजूंना होतीये मोठी मोफत मदत, अनोखा उपक्रम काय?
सर्व पहा

यंदा आयपीएलच्या हंगामाची सूरूवात ही ओपनिंग सेरेमनी विना होणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिली आहे. तसेच सैकीया यांनी यामागच कारणही सांगितलं आहे. 4 जूनला झालेल्या दु:खद घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.जेणेकरून मृतांना अशाप्रकारे श्रद्धांजली वाहता येईल,असे त्यांचे म्हणणे आहे. पण अद्याप यावर चर्चा सूरू आहे. तसेच स्पर्धेच्या शेवटी क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे.यासोबत प्रत्येक सामन्याच्या वेन्यूवर कार्यक्रम करण्याचाही प्रस्ताव आहे. जेणेकरून चाहत्यांना आणखी उत्साह वाढेल.या सगळ्या प्रस्तावावर येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL ला दोन दिवस उरले असताना BCCI चा शॉकिंग निर्णय, 140 कोटी भारतीयांना झटका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल