TRENDING:

Sarfaraz Khan : सरफराज पुन्हा वादात सापडला, बॅन वस्तू घेऊन मैदानात उतरला, अंपायरने रंगेहाथ पकडला!

Last Updated:

Sarfaraz Khan : आयपीएल 2026 मध्ये सीएसकेकडून खेळणारा सरफराज खान हा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. मोसमातला पहिला बॉल खेळण्याआधीच अंपायरने सरफराज खानवर कारवाई केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गुवाहाटी : आयपीएल 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सची बॅटिंग सपशेल अपयशी ठरली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पहिले बॅटिंग करण्यासाठी उतरलेल्या चेन्नईला पूर्ण 20 ओव्हरही बॅटिंग करता आलेली नाही. 19.4 ओव्हरमध्येच चेन्नईचा 127 रनवर ऑलआऊट झाला. आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या जेमी ओव्हरटनने 36 बॉलमध्ये 43 रनची खेळी केली, त्यामुळे चेन्नईचा स्कोअर 100 च्या पार तरी गेला.
सरफराज पुन्हा वादात सापडला, बॅन वस्तू घेऊन मैदानात उतरला, अंपायरने रंगेहाथ पकडला!
सरफराज पुन्हा वादात सापडला, बॅन वस्तू घेऊन मैदानात उतरला, अंपायरने रंगेहाथ पकडला!
advertisement

राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या तर ब्रिजेश शर्मा, संदीप शर्मा आणि रवी बिष्णोई यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

सरफराज खान पुन्हा वादात

सरफराज खान याला 3 वर्षांनंतर आयपीएलमध्ये मॅच खेळण्याची संधी मिळाली. चेन्नई सुपरकिंग्सकडून सरफराज खानने पदार्पण केलं पण मैदानात उतरताच सरफराज वादात सापडला. अंपायरनी सरफराज खान याची बॅट तपासली. अंपायरच्या बॅट टेस्टमध्ये सरफराजची बॅट फेल झाली.

advertisement

आयपीएलमध्ये अंपायर प्रत्येक बॅटरची बॅट तपासतात, यासाठी त्यांच्याकडे एक फ्रेम असते. या फ्रेमच्या आतमधून बॅट गेली तर बॅटरला त्या बॅटने खेळण्याची परवानगी दिली जाते, पण सरफराजची बॅट अंपायरच्या फ्रेममध्ये अडकली, त्यामुळे सरफराजला त्याची बॅट बदलावी लागली.

सरफराजची आक्रमक सुरूवात

सरफराज खानने बॅट बदलली तरी त्याच्या बॅटिंगमधला आक्रमकपणा अजिबात कमी झाला नाही. बॅटिंगला आल्यानंतर तिसऱ्याच बॉलला सरफराजने नांद्रे बर्गरच्या बॉलवर फोर मारली, यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये सरफराजने सिक्स हाणली, पण 8 व्या ओव्हरमध्ये फक्त 17 रन करून सरफराज आऊट झाला, रवींद्र जडेजाने सरफराजला एलबीडब्ल्यू केलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दर पडलेलेच, लिंबाला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

सरफराजने आतापर्यंत आयपीएलमध्ये 50 सामन्यांमध्ये 22.5 च्या सरासरीने 585 रन केल्या आहेत. सरफराज आयपीएलमध्ये आरसीबी, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. यानंतर आता चेन्नई सुपरकिंग्सने सरफराजला संधी दिली आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sarfaraz Khan : सरफराज पुन्हा वादात सापडला, बॅन वस्तू घेऊन मैदानात उतरला, अंपायरने रंगेहाथ पकडला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल