मुंबईकडे धोनीचा बॉलिंग अटॅक
मुंबई इंडियन्सची ही स्ट्रॅटेजी पाहता त्यांनी धोनीचा बॉलिंग अटॅक टीममध्ये घेतल्याचं दिसत आहे. शार्दुल ठाकूर हा बरीच वर्ष चेन्नई सुपरकिंग्सचा महत्त्वाचा भाग होता. तर मागच्या मोसमात मुंबईने लिलावात दीपक चहर आणि मिचेल सॅन्टनर यांना विकत घेतलं, जे बरीच वर्ष चेन्नईकडे होते. आता या मोसमात मुंबईने दीपक चहर आणि सॅन्टनरला टीममध्ये ठेवलं, तर सीएसकेचे 3 महत्त्वाचे फास्ट बॉलर मुंबईकडून खेळताना दिसतील. याशिवाय कर्ण शर्मा हादेखील सीएसकेकडे होता, जो मागच्या लिलावात मुंबईकडे आला. शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मिचेल सॅन्टनर आणि कर्ण शर्मा हे 4 खेळाडू 2021 मध्ये सीएसकेचा भाग होते, आता हे चारही खेळाडू 2026 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसू शकतात.
advertisement
कधी होणार आयपीएलचा लिलाव?
आयपीएल 2026 साठीचा लिलाव 16 डिसेंबरला अबु धाबीमध्ये होणार आहे, त्याआधी सगळ्या 10 टीमना त्यांनी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी आयपीएलला द्यावी लागणार आहे. 15 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता ही यादी जाहीर केली जाणार आहे. पण त्याआधी सीएसके आणि राजस्थान रॉयल्समध्ये सुरू असलेल्या डीलवरून बरीच चर्चा सुरू आहे. संजू सॅमसनला चेन्नईकडे द्यायला राजस्थान रॉयल्स तयार आहे, पण त्यासाठी चेन्नईने रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांची मागणी केली आहे, याबद्दल सीएसके रवींद्र जडेजासोबत चर्चा करत असल्याचं वृत्तही समोर आलं आहे.
