हैदराबादच्या कॅप्टनसीबाबत मोठा सस्पेन्स
आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सनरायझर्स हैदराबादच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. यंदाचा आयपीएलचा ओपनिंग सामना डिफेन्डिंग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या मॅचपूर्वी हैदराबादच्या कॅप्टनसीबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. पॅट कमिन्स जुलै 2025 पासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त असल्यानं त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे सनरायझर्सला मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय.
advertisement
पॅट कमिन्स अद्याप फिट नाही
अॅशेस सीरिजमधील एक मॅच खेळल्यानंतर पॅट कमिन्स मैदानापासून लांब आहे, तसेच टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2026 मध्ये देखील तो खेळू शकला नव्हता. त्यामुळे हैदराबादची धाकधूक वाढली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्सला अद्याप फिट घोषित केलं नाही. यामुळे कमिन्सच्या अनुपस्थितीत टीमची धुरा कोण सांभाळणार, याची चर्चा रंगली आहे. कमिन्स यंदा आयपीएलमधून मुकू शकतो. अशातच मोठी बातमी समोर येतीये.
ईशान किशन सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्वासाठी सज्ज
टीम इंडियाचा छोटा पॅकेट बडा धमाका असलेला स्फोटक विकेटकीपर बॅटर ईशान किशन आता सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली जाऊ शकते. नुकत्याच झालेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात ईशानने महत्त्वाची भूमिका बजावली होती. हैदराबाद मॅनेजमेंटने कमिन्सच्या जागी ईशानला योग्य पर्याय मानले असून त्याच्या नावावर गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार समोर आली आहे.
ईशान किशनचा कॅप्टनसीचा रेकॉर्ड
ईशान किशनला आयपीएलच्या कॅप्टन्सीचा अनुभव नाहीये. त्याने एकाही मॅचमध्ये कॅप्टन्सी केली नाही. अशातच कमिन्स नाही तर मग कोण? असा सवाल विचारला जातोय. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये देखील त्याला पुरेशी कॅप्टन्सीची संधी मिळाली नाही. पण ईशान किशनचा टी-20 मधील कॅप्टनसीचा रेकॉर्ड अत्यंत प्रभावी आहे. त्याने 29 मॅचेसमध्ये नेतृत्व करताना 23 विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे ट्रेव्हिस हेडला वगळून ईशानला संधी दिली जाईल का? असा सवाल विचारला जात आहे.
