TRENDING:

VIDEO : इंग्लंडचा Vaibhav Suryavanshi! 22 वर्षांच्या पोरानं टीम इंडियाचा श्वास रोखला, वानखेडेवर दिली कडवी झूंज

Last Updated:

22 वर्षाच्या खेळाडूने टीम इंडियाच्या नाकात दम करून ठेवला होता आणि विजयासाठी शेवटपर्यंत ताटकळत ठेवलं होतं. शेवटी टीम इंडिया जिंकली पण चर्चा मात्र त्या 22 वर्षीय खेळाडूची झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्डकपमध्ये गुरुवारी मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर भारताने हायव्होल्टेज सामन्यात इंग्लंडचा अवघ्या 7 धावांनी पराभव केला होता. या विजयासह टीम इंडिया फायनलला पोहोचली आहे. दरम्यान टीम इंडियाने जरी हा सामना जिंकला असला तरी सर्वांधिक चर्चा ही इंग्लंडच्या वैभव सूर्यवंशीची झाली. कारण या 22 वर्षाच्या खेळाडूने टीम इंडियाच्या नाकात दम करून ठेवला होता आणि विजयासाठी शेवटपर्यंत ताटकळत ठेवलं होतं. शेवटी टीम इंडिया जिंकली पण चर्चा मात्र त्या 22 वर्षीय खेळाडूची झाली.
jacob bethell was seen in the crowd india vs england match
jacob bethell was seen in the crowd india vs england match
advertisement

खरं तर दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात इंग्लंडसमोर भारताने 253 धावांच डोंगराएवढं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना फिल सॉल्ट, कॅप्टन हॅरी ब्रुक आणि जोस बटलर हे स्वस्तात बाद झाले होते. त्यानंतर मैदानात 22 वर्षीय जेकॉब बेथेल (वैभव सूर्यवंशीची) एंन्ट्री झाली होती.

जेकॉब बेथेल ज्यावेळेस मैदानात आला होता, त्यावेळेस इंग्लंडचा डाव संकटात सापडला होता. पण संकटमोचक बनून आलेल्या जेकॉब बेथेलने इंग्लंडचा डाव सारवत वानखेडेवर षटकारांचा चौकारांचा पाऊस पाडायला सूरूवात केली होती.जेकॉब बेथेल मैदानात एकटाच खेळत होता, त्याला विल जॅक्स वगळता मैदानात कुणीच साथ दिली नव्हती. तरी त्याने हार मानली नाही आणि आपल्या फलंदाजीच्या बळावर सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत खेचून नेला होता.

advertisement

या दरम्यान शेवटच्या ओव्हरला इंग्लंडला 30 धावांची गरज होती. बेथेल क्रिजवर असल्याने तो सामना जिंकून देईल असे वाटत होते.पण पहिल्याच बॉलवर दोन धावा चोरण्याच्या प्रयत्नात तो रनआऊट झाला आणि अख्खी मॅच फिरली. त्यांतर जौफ्राने तीन सिक्स मारले तरी इंग्लंडला सामना जिंकता आला नाही.

जेकॉब बेथेल इंग्लंडचा वैभव सूर्यवंशी कसा?

advertisement

खरं तर मागच्या 2025 च्या आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीने स्पर्धेत डेब्यू केला होता. या डेब्यूनंतर त्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये वैभव सूर्यवंशी 2017 ला त्यांच्या वडिलांसोबत रायझिंग पुणे स्टार या संघाला सपोर्ट करण्यासाठी आला होता. त्यानंतर 9 वर्षांनी तो आयपीएलमध्ये झळकला होता.

जेकॉब बेथेलच्या बाबतीत देखील तसंच काहीसं घडलं आहे. जेकॉब बेथेलचा एक व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जेकॉब बेथेलची मुलाखत घेतली जाते. या मुलाखती दरम्यान त्याला एक व्हिडिओ दाखवला जातो आणि ज्यामध्ये तो स्टेडिअममध्ये इंग्लंडला चिअर करताना दिसला होता. हा व्हिडिओ पाहून पहिल्यांदा बेथेल नकार देतो, पण नंतर तो स्पष्टपणे व्हिडिओ पाहिल्यानंतर तो आपण असल्याची कबुली देतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आगीत सगळं जळून खाक झालं, तरी हरला नाही कल्पेश, आता जोमाने सुरू आहे व्यवसाय
सर्व पहा

ही घटना आयसीसी मेन्स टी20 वर्ल्डकप 2022 ची आहे. या वर्ल्ड कप दरम्यान जेकॉब बेथेल स्टेडिअममध्ये बसून इंग्लंडला चिअर करताना दिसला होता. यानंतर तब्बल 4 वर्षानी आज तो त्याच टीमचं वर्ल्डकपमध्ये नेतृत्व करताना दिसला होता.त्यामुळे वैभव सूर्यवंशीची मिळती जुळती त्याची स्टोरी असल्याने त्याला इंग्लंडचा वैभव सूर्यवंशी म्हटलं गेलं आहे. दरम्यान वानखेडेच्या मैदानावर या इंग्लंडच्या वैभव सूर्यवंशीने सगळी मैफील लुटली होती.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : इंग्लंडचा Vaibhav Suryavanshi! 22 वर्षांच्या पोरानं टीम इंडियाचा श्वास रोखला, वानखेडेवर दिली कडवी झूंज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल