TRENDING:

Jasprit Bumrah : आशिया कपमध्ये खेळणार का नाही? बुमराहने BCCI ला पाठवला मेसेज!

Last Updated:

आशिया कपसाठी पाकिस्तानच्या टीमची निवड झाली आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना पाकिस्तानच्या टीममधून डच्चू देण्यात आला आहे. तर टीम इंडियाची निवड अजूनही झालेली नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आशिया कपसाठी पाकिस्तानच्या टीमची निवड झाली आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना पाकिस्तानच्या टीममधून डच्चू देण्यात आला आहे. तर टीम इंडियाची निवड अजूनही झालेली नाही. कर्णधार सूर्यकुमार यादव आशिया कपसाठी फिट झाला आहे, तर जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बुमराहने त्याच्या फिटनेसबाबत बीसीसीआयला मेसेज पाठवला आहे.
आशिया कपमध्ये खेळणार का नाही? बुमराहने BCCI ला पाठवला मेसेज!
आशिया कपमध्ये खेळणार का नाही? बुमराहने BCCI ला पाठवला मेसेज!
advertisement

इंग्लंड दौऱ्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजपैकी 3 सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराह खेळला होता, यानंतर तो आशिया कपमध्ये खेळणार का नाही? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता, पण आता बुमराहने आपण आशिया कपसाठी उपलब्ध असल्याचं बीसीसीआयला कळवलं आहे, असं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

वर्क लोड मॅनेजमेंट म्हणून जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यात 3 टेस्ट मॅच खेळला होता. बुमराहने निवड समिती आणि बीसीसीआयला तो आशिया कपसाठी उपलब्ध असेल, असं सांगितलं आहे. पुढच्या आठवड्यात निवड समिती भेटेल तेव्हा यावर चर्चा करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

advertisement

आशिया कपसाठी टीम इंडियाची निवड

आशिया कपसाठी टीम इंडियाची निवड करण्यासाठी निवड समिती 19 ऑगस्टला मुंबईमध्ये बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर निवड समिती प्रमुख अजित आगरकर पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना 2024 टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. या सामन्यात बुमराहने 18 रन देऊन 2 विकेट घेतल्या आणि भारताला वर्ल्ड कप जिंकवून दिला. वर्ल्ड कप फायनलनंतर बुमराहला पुढील सर्व टी-20 सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती. बुमराहने 70 सामन्यांमध्ये 17.74 च्या सरासरीने आणि 6.28 च्या इकोनॉमी रेटने 89 विकेट घेतल्या आहेत.

advertisement

बंगळुरूमध्ये शिबीर नाही

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात सुरू केली फूड स्कॉलरशिप, कुलदीप यांचे काम पाहून तुम्हीही कराल कौतुक!
सर्व पहा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय आशिया कपआधी कोणत्याही शिबिराचं आयोजन करणार नाही. मागच्या काही महिन्यांपासून टीम इंडियाने एकही टी-20 सामना खेळलेला नाही, त्याऐवजी टीम इंडिया युएईमधील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी तीन-चार दिवस लवकर पोहोचेल, त्यामुळे त्यांचा सराव चांगला होईल, असंही बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Jasprit Bumrah : आशिया कपमध्ये खेळणार का नाही? बुमराहने BCCI ला पाठवला मेसेज!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल