जॉन सीना आणि द रॉक यांच्या वन्स इन लाईफटाईम या मॅचच्या सुमारे एक वर्ष आधीच, रॉक हा रेसलमेनिया 27 चा Host म्हणून परतला आणि त्याने लगेच जॉन सीनासोबत वाद सुरू केला. या दोन वेगवेगळ्या युगातील सुपरस्टारमध्ये मोठ्या प्रमाणात शाब्दिक युद्ध झाले, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड हाईप निर्माण झाली. या मॅचॉला "Once in a Lifetime" असे प्रमोट करण्यात आले, कारण दोघंही WWE मधील सर्वात मोठे स्टार होते, पण त्यांची टाईमिंग आणि शैली पूर्णपणे वेगळी होती. सीना हा WWE चा फुल टाईम फेस होता, तर रॉक हा हॉलिवूडचा सुपरस्टार असून अनेक वर्षांनी पूर्णवेळ मॅचसाठी परतला होता.
advertisement
पाहा तो संपूर्ण सामना
दोन्ही पैलवानांमधील ही मॅच रेसलमेनिया 27 मध्ये मामिया येथे, The Rock च्या होमटाऊनमध्ये झाली होती. या मॅचमध्ये WWE मधील दोन पिढ्यांची लढत पाहायला मिळाली. संपूर्ण मॅचमध्ये फुल ड्रामा आणि चढ उतार होते. मॅचच्या शेवटी, सीनाने रॉकला त्याचीच अखेरचा फटका म्हणजेच "Rock Bottom" मारण्याचा प्रयत्न केला, पण रॉकने त्याला पलटवार करत Rock Bottom दिला आणि मॅच जिंकला. सीनाचा हा पराभव चाहत्यांसाठी धक्कादायक होता आणि या मॅचमुळे WWE च्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि Iconic Main Events पैकी एक निर्माण झाला.
