शेवटच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ट्रॉट भावुक
जोनाथन ट्रॉट यांचा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डासोबतचा करार या वर्ल्ड कपनंतर संपणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. बोर्डाने ट्रॉट यांचा कार्यकाळ न वाढवण्याचा निर्णय घेतल्याने अफगाण क्रिकेटमध्ये आता एका नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे. आपल्या शेवटच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ट्रॉट भावुक झाले होते. मुख्य प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय माझा नव्हता, म्हणून मी तेवढ्यावरच सोडतो. कदाचित वेळ योग्य असेल, कदाचित नसेलही. मला माहित नाही, पण मी माझ्या मुलांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो, असं जोनाथन ट्रॉट म्हणाले.
advertisement
राशीद खानने मानले आभार
ट्रॉट यांच्या मार्गदर्शनाखाली अफगाणिस्तान टीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी झेप घेतली होती, त्यामुळे त्यांच्या जाण्याने खेळाडू भावूक झाले आहेत. कॅप्टन राशिद खान याने मॅच संपल्यानंतर ट्रॉट यांचे आभार मानले आणि त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. ट्रॉट यांचे टीमपासून वेगळे होणे हे संपूर्ण अफगाण क्रिकेटसाठी क्लेशदायक असल्याचे राशिदने म्हटले आहे. ट्रॉट यांच्या कार्यकाळात टीमने अनेक बलाढ्य संघांना चकित केले होते.
'प्लेयर ऑफ द मॅच' अवॉर्ड
दरम्यान, कॅनडाविरुद्धच्या मॅचमध्ये 95 रन्सची तुफानी बॅटिंग करणाऱ्या इब्राहिम जादरानने आपला 'प्लेयर ऑफ द मॅच' अवॉर्ड जोनाथन ट्रॉट यांना समर्पित केला. आपल्या लाडक्या कोचला मिळालेली ही ही एक मोठी मानवंदना होती. प्रेस कॉन्फरन्स दरम्यान ट्रॉट यांच्या डोळ्यांतही पाणी उभे राहिले होते. खेळाडू आणि कोच यांच्यातील हे घट्ट नाते अफगाणिस्तानच्या क्रिकेट मैदानावरील कामगिरीत स्पष्टपणे दिसून येत होते.
