advertisement

पुण्यात पहिल्यांदाच होतेय खास क्रिकेट स्पर्धा! दिव्यांग खेळाडू गाजवणार मैदान, व्हीलचेअरवर कसा असतो खेळ?

Last Updated:

Wheelchair Cricket: देशभरात सुरू असलेल्या झोनल सामन्यांपैकी काही महत्त्वाचे सामने पुण्यात होत असून, ही नॅशनल चॅम्पियनशिप वेस्ट झोनसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

+
पुण्यात

पुण्यात क्रिकेटचा महाकुंभ! दिव्यांग खेळाडू गाजवणार मैदान, व्हीलचेअरवर कसा असतो खेळ?

पुणे : क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरणारी नॅशनल व्हिलचेअर क्रिकेट चॅम्पियनशिप यंदा प्रथमच पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील दिव्यांग क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी देणारी ही स्पर्धा 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी जवाहरलाल नेहरू क्रिकेट स्टेडियम येथे आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र संघासोबत गुजरात आणि मुंबई संघांचा सहभाग असून ही स्पर्धा व्हीलचेअर क्रिकेट इंडिया (Wheelchair Cricket India) आणि महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
देशभरात सुरू असलेल्या झोनल सामन्यांपैकी काही महत्त्वाचे सामने पुण्यात होत असून, ही नॅशनल चॅम्पियनशिप वेस्ट झोनसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यापूर्वी उदयपूर, गोवा आणि ओडिशा येथे या स्पर्धांचे आयोजन झाले होते. मात्र, पुण्यात प्रथमच ही राष्ट्रीय स्पर्धा होत असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही टीम विविध राज्यांमध्ये जाऊन सातत्याने सहभाग नोंदवत आहे.
advertisement
स्पर्धेतील सर्व खेळाडू हे राष्ट्रीय स्तरावरील दिव्यांग क्रिकेटपटू असून त्यांचे वय 21 ते 37 वर्षांदरम्यान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. सिलेक्शन ट्रायल्स या नियमित क्रिकेटप्रमाणेच घेतल्या जातात आणि खेळाडूंची निवड त्यांच्या कामगिरीच्या आधारे केली जाते. नॉर्मल क्रिकेट आणि व्हीलचेअर क्रिकेटमध्ये फारसा फरक नाही. नियम तेच असतात, फक्त खेळाडू व्हीलचेअरवर बसून सर्व ॲक्टिव्हिटी करतात, अशी माहिती महाराष्ट्र व्हीलचेअर असोसिएशन टीमचे मॅनेजर क्षितिज भावसार यांनी दिली.
advertisement
ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र या तीन संघांमध्ये चुरशीचे सामने रंगत आहेत. पीच आणि बाउंड्रीमध्ये थोडाफार तांत्रिक बदल करण्यात आला असला तरी खेळाची रंगत आणि नियम हे पारंपरिक क्रिकेटसारखेच आहेत. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्व गोष्टी खेळाडू व्हीलचेअरवर बसून करतात, जे पाहणे प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरते.
advertisement
महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून दिव्यांग खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची संधी मिळत आहे. आम्ही संपूर्ण क्रिकेट व्हीलचेअरवर बसून खेळतो. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सर्व काही नियमांनुसारच करावे लागते, अशी माहिती खेळाडू रविंद्र बारवकर यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
पुण्यात पहिल्यांदाच होतेय खास क्रिकेट स्पर्धा! दिव्यांग खेळाडू गाजवणार मैदान, व्हीलचेअरवर कसा असतो खेळ?
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement