KL Rahul Record : मॅचेस्टर टेस्टच्या पाचव्या दिवसाच्या खेळाला सूरूवात झाली आहे. या सामन्याच्या सुरूवातीलाच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. कारण टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुल 90 धावांवर बाद झाला आहे. केएल राहुल शतक ठोकण्यात अयपशी ठरला असला तरी त्याने मोठा विक्रम केला आहे. त्यामुळे त्याने नेमके काय रेकॉर्ड केले आहेत? हे जाणून घेऊयात.
advertisement
टीम इंडियाचा सलामीवर केएल राहुलने इंग्लंडमध्ये 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. खरं तर हा टप्पा त्याने चौथ्या दिवशीच 87 धावा ठोकल्यानंतर ओलांडला होता. पण त्यानतर तो सुनील गावस्कर यांचा इंग्लंडमधील 542 धावांचा रेकॉर्ड मोडेल असे वाटत होते. पण तो आऊट झाला. त्यामुळे गावस्करांचा विक्रम जरी मोडता आला नसला तरी तो त्यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
परदेशात कसोटी मालिकेत 500 पेक्षा जास्त धावा करणारे भारतीय ओपनर
774 - सुनील गावस्कर, वेस्ट इंडिज, 1971
542 - सुनील गावस्कर, इंग्लंड, 1979
508 - केएल राहुल, इंग्लंड, 2025
तसेच परदेशात कसोटी मालिकेत 500 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये अनेक भारतीय खेळाडूंची नाव आहेत. सुनील गावस्कर (774) दिलीप सरदेसाई (642) विरुद्ध वेस्ट इंडिज, 1970-71, शुभमन गिल (697*) आणि केएल राहुल (508*) विरुद्ध इंग्लंड,2025.
दरम्यान केएल राहुल हा सुनील गावस्कर (1979 मध्ये 542) नंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत 500 पेक्षा जास्त धावा करणारा दुसरा आशियाई सलामीवीर ठरला. ग्रॅमी स्मिथ (2003 मध्ये 714 धावा) नंतर 21 व्या शतकात देशात अशी कामगिरी करणारा तो दुसरा पाहुणा सलामीवीर ठरला आहे.
टीम इंडियाने सध्या दुसऱ्या डावात 198 धावा पुर्ण केल्या आहेत, टीम इंडियाते 3 विकेट पडले आहे. शुभमन गिल 93 वर खेळतोय. तर वॉशिग्टन 7 धावांवर खेळतोय. टीम इंडिया अजून 113 धावा दुर आहेत.
चौथ्या टेस्टसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन :
यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार रिषभ पंत, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज
चौथ्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन :
जॅक क्राऊली, बेन डकेट,ओली पोप,जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार),जेमी स्मिख, क्रिस वोक्स, लियाम डॉसन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर