कुलदीपने पहिल्या दोन विकेटनंतर वारंवार अपील केलं. त्यावर रोहित शर्माला देखील हसू आवरलं नाही. रोहित म्हणत होता, आऊट नाहीये बाहेर जातोय बाहेर जातोयय... माघारी जा, माघारी जा... तर मी त्यांना म्हणत होतो, दोन विकेट आहेत घरी घेऊन जाणारे का? त्यानंतरही त्याने घेण्यास नकार दिला. जेव्हा अंपायरने आऊट दिलं तेव्हा मला देखील वाटलं की नक्कीच वरती बॉल लागला आहे. तेव्हा मलाही वाटलं होतं की, अंपायर्स कॉल असेल. रोहित नेहमी मला नकार देतो आणि मी नेहमी त्याला म्हणतो की, घेऊन टाक राव.. असं कुलदीप यादव म्हणाला.
advertisement
टीमसाठी दोन डीआरएस असतात आणि मला वाटतं की, त्यातला एक माझा आहे, असं म्हणत कुलदीपने ऋषभसोबत हशा पिकवला. बॉलर म्हणून नेहमी वाटतं की आऊट आहे. पण विकेटकीपरला जास्त कळतं. डीआरएसच्या बाबतीत मी खूप खराब आहे. रोहित भाई नेहमी क्लियर बोलतो, तुला काय वाटतं लाईन नीट आहे की नाही? त्यामुळे अनेक निर्णय बरोबर होतात, असंही कुलदीप यादव म्हणाला.
दरम्यान, पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये बोलताना कुलदीप यादवने रोहित शर्माचा उल्लेख बोलता बोलता कॅप्टन म्हणून केला. पण नंतर चूक लक्षात आल्यावर त्याने केएल राहुलचं नाव घेतलं अन् त्याचं कौतूक केलं अन् रोहित शर्माचा उल्लेख माजी कॅप्टन म्हणून केला.
